घरलाईफस्टाईलपोटाचा घेर कमी करण्यासाठी प्रभावी ५ योगासने

पोटाचा घेर कमी करण्यासाठी प्रभावी ५ योगासने

Subscribe

या आसनामुळे तुमच्या पोटावरलील चरबी कमी होण्यास मदत होईल.

सुटलेलं पोट कमी करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. याकरिता अनेक उपायदेखील केले जातात. यात कुणी डाएट करत तर कुणी एक्सरसाईजला प्राधान्य देत. मात्र, तरी देखील पोटाचा घेर कमी होत नाही. तसेच हा आता फक्त मोठ्यांचा प्रश्न राहिलेला नाही, तर मैदानी खेळांचा अभाव, खाण्यापिण्याच्या बदलेलल्या सवयी यामुळे अगदी तीन वर्ष वयापासूनच्या मुला-मुलींची पोटं सुटलेली दिसायला लागली आहेत. अशा मुलांना मोठेपणी कितीतरी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. अशा मुलांचा आहार आणि शारीरिक हालचालींकडे पालकांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे असतेच. मात्र, त्यासोबत योगासने केल्यास त्याचा अधिक फायदा होतो. चला तर जाणून घेऊया कोणती योगासने केल्यास तुमच्या पोटाचा घेर कमी होण्यास मदत होईल.

धनुरासन

- Advertisement -

या आसनात शरीराची अवस्था धनुष्याप्रमाणे होते म्हणून या आसनाला धनुरासन म्हणतात. या आसनामुळे शरीराचे स्नायू दृढ आणि लवचिक होतात. पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पोट, पाठ, मान, छाती, हात, पाय यांसारख्या अवयवांना एकचवेळी उत्तम आणि योग्य ताणाची स्थिती मिळाल्याने, शरीराला होणारा लाभ वृद्धिंगत होतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोटांचे स्नायू खेचले गेल्यामुळे पोटाची अतिरिक्त चरबी कमी होते.

वक्रासन

- Advertisement -

अनेकदा आपण कामानिमित्त नेहमी पुढे वाकत असतो. त्यामुळे पाठीचा कणाही नेहमी पुढच्या दिशेने अधिकाधिक वाकविला जातो. त्याच्या अगदी नेमकी उलट अवस्था या आसनात करावी. त्यामुळे पाठीच्या कण्याची कार्यक्षमता वाढायला या आसनाचा उपयोग होतो. यामुळे पोटाचे, मांड्यांचे, पोटर्‍यांचे स्नायू कार्यक्षम होतात आणि पोटाचा घेर कमी करण्यास मदत होते.

भुजंगासान

भुजंगासान हे खांदा आणि मानेला मोकळे करते. त्याचबरोबर पोट पुष्ट करते. यामुळे संपूर्ण पाठ आणि खांदे सशक्त बनवतात. तसेच पाठीच्या मधल्या आणि वरील भागांना लवचिक बनवते. त्याचबरोबर रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा, तणाव कमी होतो आणि सुटलेले पोट कमी होण्यास मदत होते.

चक्‍की चलनासन

योगचं हे आसन पोटाची चर्बी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या योगात वजन कमी करण्यात मोठी मदत होते.

पश्चिमोत्तानासन

शरीराच्या पाठीकडील बाजूचे स्नायू, विशेषत: मांडीच्या मागील आणि कमरेचे स्नायू जास्त लवचिक बनवतात. विशेष म्हणजे ओटीपोटावर घनदाब निर्माण झाल्याने तेथील मेद कमी होतो. त्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -