घरलाईफस्टाईलसावधान! शरीरातील पाणी कमी झाल्यास होतील 'हे' आजार

सावधान! शरीरातील पाणी कमी झाल्यास होतील ‘हे’ आजार

Subscribe

जाणून घ्या शरीरातील पाणी कमी झाल्यास कोणते आजार उद्भवू शकतात.

पाणी हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे. तसेच दिवसाला तीन लीटर पाणी पिणे फार महत्त्वाचे असते. मात्र, असे असूनही काहीजण पाणी पिणे शक्यतो टाळतात. पण, शरीरात पाणी कमी गेल्याने अनेक आजार देखील उद्भवू शकतात. चला तर जाणून घेऊया पाणी कमी झाल्यास कोणते आजार उद्भवू शकतात.

ओठ कोरडे पडतात

- Advertisement -

आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले असल्यास आपले ओठ हे सुकल्यासारखे वाटतात. त्यामुळे दिवसभरात टप्प्याटप्प्याने पाण्याचे सेवन करणे फार गरजेचे असते.

घसा कोरडा पडणे

- Advertisement -

बऱ्याचदा आपला घसा कोरडा पडतो. याचे कारण म्हणजे आपण कमी प्रमाणात पाणी पितो. त्यामुळे असे कधीही करु नका. कायम पाणी पित राहावे.

तोंडाला दुर्गंधी येणे

अनेकांच्या तोंडाला दुर्गंधी येते. ही दुर्गंधी शरीरात पाणी कमी गेल्याने येते.

त्वचा कोरडी पडणे

अनेकदा आपली त्वचा ही कोरडी पडत असते. याचे कारण म्हणजे शरीरातील पाणी हे कमी झाल्याचे निमित्त होय. कमी पाणी पिल्याने त्वचा कोरडी पडते. मात्र, आपण लोशन किंवा इतर औषधी वापरून त्वचा नरम करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, असे करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्वकाही करावे. पाणी पिल्यानंतर आपली त्वचा कोरडी पडणार नाही.

चेहरा सुकतो

जर आपण पाणी कमी पीत असाल तर आपला चेहरा हा कायम सुकलेला वाटतो. त्यामुळे पाण्याचे सेवन नेहमी करावे. जेणेकरून आपला चेहरा हा तजेल आणि टवटवीत दिसेल. दिवसातून तीन ते चार लिटर पाणी हे अवश्य प्यावे. त्यामुळे आपल्याला फायदा होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -