घरलाईफस्टाईलआपला मुलगा, मुलगी सायबर जाळ्यात अडकला नाही ना?

आपला मुलगा, मुलगी सायबर जाळ्यात अडकला नाही ना?

Subscribe

संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार ११-१६ वयोगटातील मुलांना इंटरनेटच्या माध्यमातून फसवण्यात आल्याच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होत आहे. जगभरातील इंटरनेटवर सक्रिय असलेल्या १३ कोटी किंवा प्रत्येकी ३ पैकी १ मुलगा-मुलगी कोणाच्या धमकीला बळी पडतात. तर ११-१८ वयोगटातील जवळपास २० टक्केे मुले-मुली सांगतात की त्यांना ऑनलाईन धमकी किंवा अन्य प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागले आहे.

सायबर प्रिडेटर अल्पवयीन मुला-मुलींना हेरून त्यांना जाळ्यात अडकवतात. अनेकदा ते त्यांचे शोषण करुन ब्लॅकमेल करतात. त्यांना भीती दाखवून अश्लील कृत्य करवून घेतात किंवा महत्वाची माहिती काढून घेतात. त्यामुळे मुलांमध्ये सायबर सिक्युरिटीविषयी जागृती करणे ही शिक्षकांसह पालकांची जबाबदारी आहे.

अशाप्रकारे ठेवा आपल्या पाल्यांवर नजर
*इंटरनेटशी कनेक्टेड डिवाईस देण्यापूर्वी त्यामध्ये पॅरेंटल कंट्रोल सॉफ्टवेअर इन्स्टाल करा. या सॉफ्टवेअरमुळे तुम्हाला त्यांच्या अ‍ॅक्टिविटी रेकॉर्ड करता येतील. याच्या सहाय्याने पालक किवर्ड्स, साईट्स, गेम्स अन्य आक्षेपार्ह गोष्टींनाही ब्लॉक करू शकतात.

- Advertisement -

* मुले जेव्हा ऑनलाईन राहतात. तेव्हा त्यांच्या जवळपास रहा. ते कोणता मजकूर पाहत आहेत यावर नजर ठेवा.

* मुलांना अनोळखी व्यक्तींशी वैयक्तिक, पासवर्ड व ई-मेलसंबंधी माहिती शेअर करण्यापासून सावध करा.

- Advertisement -

* सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असणार्‍या मुलांना कोणाला कसे ब्लॉक करायचे याबद्दल माहिती द्या. यासह अनोळखी व्यक्तींशी बोलणे किंवा फ्रेंडशिप रिक्वेस्ट स्वीकार करणे, अशा गोष्टींना टाळायला शिकवा.

* मुलांना आपले वैयक्तिक छायाचित्र सोशल मीडियावर टाकू देऊ नका. त्यांनी असे केल्यास काय धोके उद्भवू शकतात याबद्दल सांगा.

* अनोळखी व्यक्तींच्या ई-मेल किंवा ओपिनियन पोलच्या प्रश्नांना उत्तर न देण्याबद्दल त्यांना निर्देश द्या. चुकून त्यांनी असे केल्यास आणि त्यांना कोणी त्रास देत असल्यास त्यांना जवळच्या व्यक्तींना, पालकांना सूचित करण्यास सांगा.

* शिक्षक आणि पालक यांना मुलांवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना सायबर क्राईम विषयी माहिती द्या. त्यांना जागरुक करा.

त्यांच्या ऑनलाईन फ्रेंड्सविषयी माहिती घ्या. त्यांच्या ऑनलाईन फ्रेंड्ससोबत संवाद साधा. जेणेकरुन ऑनलाईन फ्रेंड्सला कळेल की पालक त्यांच्यावर नजर ठेवून आहेत.

जर इंटरनेटच्या माध्यमातून तुमच्या पाल्याशी कोणी चुकीचे वागत आहे. तर त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा. आयटी अ‍ॅक्ट २००० मध्ये यासंबंधी प्रावधान करण्यात आले आहेत. भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या अंतर्गत पोलिसात गुन्हा पण दाखल करण्यात येऊ शकतो. जर पोलीस तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ करतील, तर तुम्ही सरळ न्यायालयात खटला दाखल करू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -