यम्मी खाऊचा डबा

Mumbai
khaucha daba

नेहमी नेहमी डब्यात पोळी भाजी पाहून मुले कंटाळतात. त्यामुळे अनेकदा मुले भरलेला डबा तसाच घरी परत आणतात. त्यामुळे पालकांना आज डब्यात काय द्यायचे असा प्रश्न पडतो. पालकांनाही उपयुक्त ठरतील व मुलंही आवडीने डबा खातील, अशा काही टिप्स खास पालकांसाठी.

*मोड आलेल्या कडधान्यांची भाजी न करता, त्याची उसळ बनवावी व ती डब्यात द्यावी.
*मुळा, बीट यासारख्या भाज्यांचा पाला बनवून डाळीसह भाजी बनवून द्यावी.
*शेंगदाणे, लसूण, खोबरे व डाळींची चटणी पोळी भाजी बरोबर द्यावी.
*लहान मुले विशिष्ट प्रकारची भाजी खाताना नाक मुरडतात. त्यामुळे अशा भाज्यांचा खुसखुशीत पराठा तसेच पुरी बनवून, ती डब्यात द्यावी.
*गोड पदार्थ लहान मुलांना खूप आवडतात. तेव्हा पोळीबरोबर तूप, गूळ किंवा शेंगदाण्याचा लाडू, चिक्की सारखे गोड पदार्थ डब्यात देता येतील.
*आठवड्यातून एकदा इडली, डोसा सारखे पदार्थही नक्की द्यावे.
*विविध प्रकारच्या धान्यांची पीठे एकत्र करून त्यापासून वेगळा पदार्थ बनवून तो डब्यात दिल्यास लहान मुले असे पदार्थ आवडीने खातात.
*सर्वात महत्त्वाचे रोज एक फळ डब्यात जरूर द्यावे. केळ, सफरचंद, पेरू, चिकू सारखी फळे सहज उपलब्ध असतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here