घरलोकसभा २०१९डोक्याला शॉटप्रत्येक गल्लीतलेवेगळे अण्णासाहेब!

प्रत्येक गल्लीतलेवेगळे अण्णासाहेब!

Subscribe

शेवटी एकदाची अण्णासाहेबांच्या घरापासून प्रचारयात्रा सुरू झाली.

…अण्णासाहेब आधी घरासमोरच्या देवळात गेले…नंतर अण्णासाहेबांच्या बायकोसह त्यांच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांना ओवाळलं आणि मुलाने नारळ फोडल्यानंतर अण्णासाहेबांच्या प्रचारसभेची घोषणा दिली गेली…

- Advertisement -

…अण्णासाहेब पार म्हणजे पार पुढे आणि त्यांचे सगळे समर्थक त्यांच्या चार पावलं मागे अशी त्यांच्या प्रचारयात्रेची रचना होती…

…अण्णासाहेबांची प्रचारयात्रा पहिल्या चौकात आली…ह्या चौकातल्या एका शिक्षणमहर्षींचं नुकतंच निधन झाल्यामुळे तो चौक त्या शोकातून सावरलेला नव्हता…

- Advertisement -

…अण्णासाहेब तिथे म्हणाले, ह्या शिक्षणमहर्षींच्या हाताखाली मी माझ्या शिक्षणाचं बाळकडू घेतलं, त्यामुळे ह्या चौकाशी माझं बालपणापासूनचं नातं आहे…अण्णांच्या भाषणाला तिथल्या लोकांनी अतिशय गहिवरून टाळ्या दिल्या…

…त्याच्यापुढच्या नाक्यावर अण्णासाहेबांची प्रचारयात्रा आली…तिथला बापट श्रीखंडवाला अख्ख्या तालुक्यात जाम फेमस होता…

…अण्णासाहेब इथे म्हणाले, मी माझ्या उभ्या आयुष्यात ह्या नाक्यावरच्या बापटांशिवाय इतर कुठेही श्रीखंड खाल्लं नाही, त्यामुळे ह्या नाक्याशी माझं बालपणचं नातं आहे…अण्णांच्या भाषणाला तिथल्या लोकांनी भारावून टाळ्या दिल्या…

…तिथूनच पुढच्या मैदानात अण्णासाहेबांची प्रचारयात्रा दाखल झाली…तिथे क्रिकेट खेळणार्‍या पोराटोरांना अण्णासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी लागलीच पिटाळून लावलं…

…अण्णासाहेब तिथे म्हणाले, ह्याच मैदानात मी क्रिकेट खेळलो…इथेच मी कुणाला रनआउट कसं करायचं ते शिकलो आणि कुणाचा कॅच मुद्दाम कसा सोडायचा तेही मला कळलं…त्यामुळे ह्या मैदानाशी माझं कायमचं नातं आहे…तिथले लोकसुध्दा अण्णासाहेबांवर भलतेच खुश झाले…

…तिथून पाच रस्ते ओलांडल्यावर एक अध्यात्मिक केंद्र होतं…अण्णासाहेबांची प्रचारयात्रा तिथपर्यंत पोहोचली…

…अण्णासाहेब तिथे म्हणाले, ह्याच पंचक्रोशीने माझ्यात भक्तीभाव बिंबवला, इथेच मला जीवनाकडे बघायचा दृष्टीकोन मिळाला, त्यामुळे ह्या परिसराशी माझं लहानपणापासूनचं नातं आहे…तिथले भक्त लोक अण्णांवर प्रसन्न झाले…

…पुढच्या आळीत अण्णासाहेबांची प्रचारयात्रा आली…इथल्या आळीतल्या चार सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांना आर्थिक फसवणुकीवरून पोलीसांनी दोनच दिवसांपूर्वी उचलून नेलं होतं…

…अण्णासाहेबांना तिथे काही म्हणायचं नव्हतं…पण तिथल्या एकाने अण्णासाहेबांच्या तोंडासमोर बळजबरीने माइक नेल्यावर अण्णा म्हणाले, माझ्या आयुष्यात मी नेहमी शेवटी सत्याचाच विजय होताना पाहिला आहे, पण तोपर्यंत सत्याला बंदिवास पत्करावा लागतो…माझं आणि सत्याचं लहानपणापासूनचं नातं आहे…

…अण्णांच्या ह्या डायलॉगवर आळीतल्या लोकांनी टाळ्या तर वाजवल्याच, पण शिट्ट्यासुध्दा फुंकल्या…

-अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -