घरलोकसभा २०१९डोक्याला शॉटमुलुखावेगळं हत्यार!

मुलुखावेगळं हत्यार!

Subscribe

चल सांग, दहशत कशाकशाची वाटू शकते?…मोरूने मित्राला हसत हसत अगदीच भाबडा आणि बावळट प्रश्न केला.

…पण काय रे, हा प्रश्न आजच विचारायचा मुहूर्त तू कुठून शोधून काढलास?…मित्राने मोरूला गंभीरपणे चतूर प्रतिप्रश्न केला…

- Advertisement -

…अरे, मुहूर्त निवडणुकीचा फॉर्म भरायला लागतो, प्रश्न विचारायला नाही…मोरूने प्रतिप्रश्नाला हसत हसत प्रत्युत्तर दिलं…

…पण तरीही ज्यांना प्रश्न विचारण्याचा खास हक्क दिलेला आहे त्यांना ज्यांच्याकडून उत्तर देण्याची अपेक्षा आहे त्यांचीच हल्ली दहशत वाटत असते…मित्राने मोरूला नकळत अगदी मनातलं उत्तर देऊन टाकलं…

- Advertisement -

…तुझं म्हणणं खरं आहे, पण तरीही आणखी कशाकशाची दहशत वाटू शकते हे तर सांग?…मित्राकडून उत्तर मिळण्यासाठी मोरू गंमतीगंमतीत का होईना, पण अगदी इरेला पेटला…

…मोर्‍या, अरे तू कशाकशाची दहशत म्हणतो आहेस, कुणाकुणाची दहशत म्हणत नाहीस…मित्राने मोरूला पेचात पकडला…

…आता बरोबर पॉइंटवर आलास, मी व्यक्तीची दहशत म्हणत नाही, मी कुठल्या वस्तूंची दहशत वाटते, असं म्हणतोय…मोरूने मित्राला ताळ्यावर आणला…

…व्यक्तीची दहशत नाही तर मग व्यक्तीकडल्या वस्तूंंची दहशत असेल…मित्राने मोरूला सहज दगड टाकला…

…व्यक्तीकडल्या वस्तूंंची दहशत तर व्यक्तीकडल्या वस्तूंंची दहशत, पण सांग तर खरं!…मोरू आता आणखी इरेला पेटला…

…एक म्हणजे अर्थातच, बंदुकीच्या नळीची दहशत…मित्राने मोरूला उत्तर द्यायला सुरूवात केली…

…ठीक आहे, दुसर्‍या कुठल्या गोष्टीची दहशत?…मोरूने मित्राला पुन्हा उत्सुकतेने विचारलं…

…दुसरी लेखणीची दहशत…मित्राने कोडं पुन्हा एकदा उलगडून दाखवलं…

…बरोबर, चल, आणखी कसली दहशत सांग?…मोरूने पुन्हा पेच टाकला…

…आणखी कसली म्हणजे?…आणखी सीबीआयच्या, इन्कम टॅक्सवाल्यांच्या छाप्यांची!…मित्राने हसतखेळत उत्तर दिलं…

…ए आता ईडीचं उदाहरण देऊ नका हं, आधीच सांगून ठेवतो…मोरूने मित्राला जरा दरडावलंच…

…मग आता आणखी काय सांगणार!, आता कोड्यात ठेवू नकोस, तुच सांगून टाक तुझ्याकडली दहशत वाटणारी वस्तू!…मित्र हतबल झाला…

…सांगू? मनसेेच्या स्टेजवरचा स्क्रीन आणि ए, चल लाव रे व्हिडियो…मोरूने उत्तर दिलं आणि मित्राने लगेच टाळी दिली…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -