टार्गेट…

Subscribe

डोक्याला शॉट 

मोटाभाय ह्ये राज ठाकरे आपल्या पिछे इतके शामाटे लागले हाय?…चक्क एक सभा चालू असताना छोटाभायनी मोटाभायच्या कानात फार धीरगंभीरपणे प्रश्न विचारला.

…मोटाभायसुध्दा ह्या धीरगंभीर प्रश्नावर मनातून धीरगंभीर झाले…पण त्यांनी चेहर्‍यावर ते भाव कलात्मक पध्दतीने आणले नाहीत…

- Advertisement -

…आं? शामाटे इतके राज ठाकरे आपल्या मागे लागले हाय?…छोटाभायना मोटाभायकडून उत्तर मिळण्याची अतिशय उत्सुकता होती…

…हा प्रश्न तू मला परत परत विचारू नको, मला खरा शांगायचा तर परत परत काय, एकदा बी कोणता प्रश्न विचारलेला आवडत नाय…मोटाभाय असं काहीही बोलले नाहीत, पण त्यांच्या नजरेतूनच छोटाभायना हे उत्तर मिळालं…

- Advertisement -

…मधल्या काळात त्या सभेत एक-दोन वक्त्यांची भाषणं झाली…मोटाभाय आणि छोटाभायना अवजड हार घालून झाले, गदा देऊन झाली…

…मोटाभाय आणि छोटाभाय, दोघंही आपापल्या आसनांवर स्थानापन्न झाल्यावर छोटाभायनी पुन्हा आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळावं ह्या अपेक्षेने मोटाभायकडे पाहिलं…

…मोटाभायनाही ते कळलं आणि त्यांनी उत्तर द्यायची तयारी दाखवली…लागलीच छोटाभायनी आपला कान मोटाभायच्या आसनाजवळ नेला…

…ह्ये बघ, मला बी भाषण करण्याचा लई आवड हाय, अगदी तशाच राज ठाकरेंनाबी बी भाषण करण्याचा लई आवड हाय…मोटाभायनी छोटाभायच्या कानात सांगायला सुरूवात केली…

…ज्येला कुठे ना कुठे भाषण द्यायची सवय असते त्येने त्येचा तोंड बंद ठेवला तर त्येला कोंडल्याशारखा होतो, हे मी तुला माज्यावरून शांगतो…मोटाभायने आपला अनुभव हळुच हसत छोटाभायच्या कानात सांगितला…

…पण म्हणून ते भाषण देत असले तरी ते आपल्या विरोधमधी परत परत बोलते हाय ना, त्येच्या काय?…छोटाभायने मोटाभायला आवडत नसलं तरी प्रश्न केला…

…तू थांब, मी त्येचा समदी माहिती मागवून घेतला हाय…मोटाभायनी भलताच घनगंभीर कटाक्ष टाकत छोटाभायला म्हटलं…

…इतक्यात मोटाभायचं नाव भाषणासाठी पुकारलं गेलं म्हणून भोटाभाय उठले…आणि छोटाभाय आता ते काय बोलणार ह्या उत्सुकतेने त्यांच्याकडे कान टवकारून पाहू लागले…

…मोटाभायनी साठ वर्ष, पाकिस्तान, देशद्रोही, राष्ट्रवादी वगैरे विषयांवर जबरदस्त बॅटिंग केली…पण छोटाभायना हव्या त्या विषयावर ते जराही बोलले नाहीत…

…सभा संपल्यानंतर एकाच गाडीतून जाताना ते छोटाभायना इतकंच म्हणाले…हे बघ, आपला ह्ये टाइमच्या टार्गेट बारामती हाय, आपण शिवाजी पार्कला गेला तरीबी बारामतीबद्दलच बोलायच्या, बारामती जेवढा आपल्याला पब्लिसिटी देईल तेवढा शिवाजी पार्कबी देणार नाय…

-अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -