मास्टरस्ट्रोक!

Subscribe

हल्लीचं राजकारण म्हटलं की त्यात स्ट्रेटेजी आली…आणि स्ट्रेटेजी आली की त्यात मास्टरस्ट्रोक हे आलेच.

…परवा एक राजकीय विश्लेषक असं म्हणताना पुढे म्हणाले की मास्टरस्ट्रोक करण्यात मास्टर असल्याशिवाय आता कुणाला सत्तेचा सोपान चढताही येणार नाही…आणि सत्तेचा सोपान चढल्यास तो राखताही येणार नाही…

- Advertisement -

… त्या राजकीय विश्लेषकासमोर गबाळ्या कपड्यातले एक राजकीय चिकित्सक बसले होते…त्यांना कोणत्याही प्रश्नात खोड काढण्याची सवय होती…

…ह्या चिकित्सकांनी साहजिकच आपल्या खोडकर स्वभावाला जागून एक प्रश्न विचारला…शिंपीकाम करणार्‍या शिंप्यालासुध्दा लोक मास्टर म्हणतात, मग तो गिर्‍हाईकाला काज-बटणं करायची राहिलीत असं म्हणून कटवतो तोही मास्टरस्ट्रोक असतो काय?…

- Advertisement -

…विश्लेषक म्हणाले, शिंप्याला लोेक मास्टर म्हणाले तरी तो खर्‍या अर्थाने मास्टर होऊ शकत नाही…आणि कैची घेऊन तो कापडावरही मास्टरस्ट्रोक करू शकत नाही…

…चिकित्सक पुन्हा खोडकरपणे म्हणाले…बरोबर आहे तुमचं म्हणणं, शिंपी मास्टरस्ट्रोक करू शकला असता तर लोक शिंपी चिंधीचोर है असं म्हणू शकले असते…

…विश्लेषक म्हणाले, मास्टरस्ट्रोक करणं ही फार मोठी गोष्ट आहे…आणि ती अशी कुणालाही जमत नाही…आणि ती एकदा जमली की ती पुन्हा पुन्हा जमवण्याचं व्यसनच लागतं…

…चिकित्सक पुन्हा एकदा खोडकरपणे म्हणाले…म्हणजे नोटबंदीचा मास्टरस्ट्रोक झाला की जीएसटीचा मास्टरस्ट्रोक असं का?…

…विश्लेषकांना चिकित्सकाचा तो मुद्दा पटला असावा…म्हणून त्यांनी हळूच किंचित डोळा मारला…

…एव्हाना चिकित्सकांची हिंमत वाढली म्हणून त्यांंनी हल्लीच्या राजकारणातले आणखी काही मास्टरस्ट्रोक जाणून घेण्याची जिज्ञासा दाखवली…

…ते म्हणाले, बालाकोट हासुध्दा मास्टरस्ट्रोक होता तर मग अंतराळात आपणच आपला उपग्रह पाडला हासुध्दा मास्टरस्ट्रोकच होता काय?…

…विश्लेषक म्हणाले, चला म्हणजे आता तुम्हाला कळलं की मास्टरस्ट्रोक म्हणजे काय ते?…

…पण काय हो विश्लेषक, क्षणाचीही उसंत न बाळगता ह्या महिन्यांत जे मास्टरस्ट्रोकमागून मास्टरस्ट्रोक झाले ते मास्टस्ट्रोकसुध्दा हल्ली लोक पटकन विसरतात म्हणून की काय?…चिकित्सक खोडी काढल्याशिवाय राहिले नाहीत…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -