खरंच कुणाची झोप उडाली?

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञानसंपत्ती भेटे हे लहानपणी सगळ्यांना शिकवलं जातं…राजकारणातल्याही सगळ्या पक्षातल्या सगळ्या लोकांना शिकवलं जातं.

…पण इतकी मोलाची शिकवण मिळूनही राजकारणातल्या माणसांना आपल्या बेडरूममध्ये लवकर जायची संधी मिळत नाही…लवकर उठावं मात्र लागतं…

…त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होते की नाही, ह्याबद्दल अजून कोणत्या संस्थेने कसलं सर्वेक्षण केलेलं नाही…पण त्यांची झोप का उडते ह्याचं निरीक्षण अलिकडेच वर्ध्यामध्ये उंच व्यासपीठावरून उंच आवाजात नोंदवण्यात आलं…

…वर्ध्यात हे निरीक्षण नोंदवण्यात आलं…आणि देशातल्या सव्वाशे कोटी जनतेचं लक्ष राष्ट्रवादीतल्या नेत्यांकडे वेधलं गेलं…

…राष्ट्रवादीतल्या नेत्यांची झोप हल्ली तिहारच्या तुरूंगात अडकलेली आहे, असा निष्कर्ष वर्ध्यात काढल्यानंतर राष्ट्रवादीतले लोक खरंच झोपाळलेले दिसतात का, ह्याबद्दल बरीच कुजबूज महाराष्ट्रातल्या दरीखोर्‍यात सुरू झाली…

…कायम आकडेवारी तोंडावर फेकणार्‍या एका आकडेतज्ज्ञांनी महाराष्ट्र देशीच्या कानाकोपर्‍यात जाऊन झोपेच्या गोळ्या किती खपल्या जातात ह्याचे आकडे मिळवण्याचा प्रयत्न …खासकरून माढा, मावळ, बारामती, भंडारा, गोंदिया ह्या प्रांतात जाऊन झोपेच्या गोळ्यांचा किती खप होतो ह्याचा कानोसा घेतला…

…पण उत्सुकतेने आकडेवारी मिळवायला गेलेल्या ह्या उत्साही आकडेतज्ज्ञाच्या विरोधातच ही आकडेवारी गेली…हल्ली लोकांना झोपा येत नसतील तर झोपेच्या गोळ्या न घेता ते सरळ मोबाइलमध्ये शिरतात असं धक्कादायक निरीक्षण सगळीकडून त्याच्या कानावर आलं…

…अरेच्च्या, म्हणजे वर्ध्यामधल्या उंच व्यासपीठावरून उंच आवाजात नोंदवण्यात आलेलं ते निरीक्षण फुटकळ निघालं की काय?…आकडेतज्ज्ञांनी स्वत:च्या मनात स्वत:पुरतंच प्रश्न नोंदवला…

…आकडेतज्ज्ञांनी मग स्वत:शीच एक शक्कल लढवत झोपा उडालेल्या संशयितांचे डोळे डोळ्यात डोळा घालून बघायची मोहीम हाती घेतली…पण तीही मोहीम अपयशी ठरली, कारण कुणाचेच डोळे झोपाळलेले आढळले नाहीत…

…एकामागून एक सगळ्यांच्याच डोळ्यांत गाढ झोपेचे सज्जड पुरावे मिळाल्यानंतर आकडेतज्ज्ञ निराश झाले…आणि निराशेच्या गर्तेत त्यांनी सगळे आकडे फाडून फेकून दिले…

…आता त्यांनी उंच व्यासपीठावरून कुणी काही उंच स्वरात म्हणालं तर फार उंचावरलं बघायचं, पण ऐकायचं नाही असं ठरवलं…आणि आकडे शोधायला तर मुळीच जायचं नाही असं एकजात ठरवून टाकलं…

-अँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here