पोलिटिकल सेलिब्रिटी.

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

…लोकांना वाटायचं की झम्प्याने नानांच्या बहुजनविकासाच्या धोरणांचा पुरस्कार केला म्हणून झम्प्या नानांच्या पक्षात आला आहे…खरी परिस्थिती अशी होती की झम्प्याने विकास हा शब्द नागरीक शास्त्रात वाचला होता, पण बहुजन म्हणजे काय भानगड आहे हे त्याला काहीही कळलं नव्हतं…पण तरीही नाना बहुजनविकास म्हणतात म्हणून झम्प्याही आपल्या भाषणात बहुजनविकास हा शब्द न अडखळता बोलू शकत होता…नानांच्या विचारसरणीचे नानांचे अनुयायी त्यामुळे झम्प्याच्या प्रेमातच पडले होते…

जयकांत एका सिरीयलमधल्या एका एपिसोडमधल्या एका सेकंदाच्या दृश्यात लोकांना दिसला, पण दुसर्‍या दिवशी त्याला एका वर्तमानपत्राने त्याचा जीवनाबद्दलचा दृष्टीकोन विचारला.

…झालं, जयकांत सेलिब्रिटी झाला…त्याने ज्या सिरीयलमध्ये एका सेकंदासाठी जे पात्र सादर केलं होतं त्या पात्राचं नाव होतं झम्प्या…साहजिकच, तो झम्प्या म्हणून गावागावात शॉलेड फेमस झाला…

…नंतर त्याचं एकूण अभिनय सामर्थ्य बघून एकाही सिरीयलमधून त्याला बोलावणं आलं नाही…पण झम्प्या म्हणून सभासमारंभासाठी जिकडूनतिकडून बोलावणं यायला लागलं…

…आपण फेमस झालो हे झम्प्याच्याही लक्षात आलं…झम्प्यानेही त्याचा अ‍ॅडव्हान्टेज घ्यायचं ठरवलं…

…झम्प्याने ज्या दिवशी आपल्या पॉप्युलॅरीटीचा अ‍ॅडव्हान्टेज घ्यायचा ठरवलं, त्याच दिवशी पोलिटिकल लोकांनी झम्प्याचा पोलिटिकल अ‍ॅडव्हान्टेज घ्यायचं ठरवून टाकलं…

…पहिली पोलिटिकल सुपारी त्याला नाना मारणेंच्या पक्षाकडून आली…नानांच्या प्रत्येक गल्लीबोळ सभासमारंभाच्या स्टेजवर झम्प्या दिसायला लागला…

…लोकांना वाटायचं की झम्प्याने नानांच्या बहुजनविकासाच्या धोरणांचा पुरस्कार केला म्हणून झम्प्या नानांच्या पक्षात आला आहे…खरी परिस्थिती अशी होती की झम्प्याने विकास हा शब्द नागरीक शास्त्रात वाचला होता, पण बहुजन म्हणजे काय भानगड आहे हे त्याला काहीही कळलं नव्हतं…

…पण तरीही नाना बहुजनविकास म्हणतात म्हणून झम्प्याही आपल्या भाषणात बहुजनविकास हा शब्द न अडखळता बोलू शकत होता…नानांच्या विचारसरणीचे नानांचे अनुयायी त्यामुळे झम्प्याच्या प्रेमातच पडले होते…

…कायम जडबंंबाळ भाषेत लिहिणार्‍या एका साक्षेपी संपादकाने तर झम्प्या अभिनेता असूनही त्याने समाजकारणासाठी राजकारणात प्रवेश केला ह्याबद्दल चक्क एक फडफडीत अग्रलेख लिहिला…पण झम्प्याला त्या अग्रलेखातलं एक अक्षर कळलं नाही…

…झम्प्याला आता इतकंच कळत होतं की झम्प्या म्हणून अजूनही आपल्याला मागणी आहे…आणि नवा कुणी पम्प्या बाजारात उपटला की आपली एक्स्पायरी डेट जवळ येणार आहे…

…काही दिवसांनी झम्प्या नाना मारणेंच्या बहुजनविकासवादी स्टेजवरून दिसायचा अचानक बंद झाला…नानांनी आपली माणसं पाठवूनही झम्प्या नानांच्या स्टेजकडे फिरकला नाही…

…पण मध्ये एक मोठा पॉज घेऊन बर्‍याच दिवसांनी झंप्या जो झळकला तो डायरेक्ट नाना मारणेंचे विरोधक अण्णा धोरणेंच्या स्टेजवरच दिसला…अण्णा धोरणेंचा पक्ष चंगळवादी म्हणून प्रसिध्द होता…

…झम्प्याचं असं अचानक का झालं?…सरळ आहे, झम्प्याला बहुजनवाद कधीच कळला नाही, पण चंगळवाद चटकन कळला…

– अँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here