स्वबळ म्हणजे काय रे भाऊ?

Mumbai
Dokyla shot editorial
डोक्याला शॉट संपादकीय

नववी तुकडी फ मधल्या दोन मुलांच्या हातात कुणाचं तरी एक वर्तमानपत्र आलं आणि मजामस्करी म्हणून ते चाळता चाळता त्यांना एक शब्द दिसला आणि त्या शब्दाबद्दल त्यांचं कुतुहल चाळवलं.

…तो शब्द होता ’स्वबळ’…

…पहिल्याने दुसर्‍याला विचारलं, काय असेल रे स्वबळ म्हणजे?…

…दुसरा म्हणाला, हा राजकारणातला शब्द दिसतोय…म्हणजेच भुस्सा भरलेला पोकळ शब्द असणार तो…

…अरे पण त्या स्वबळाच्या पुढे नारा असा आणखी एक शब्द आहे…पहिल्याने प्रश्न केला…

…दुसरा म्हणाला, अरे बरोबर आहे…कारकिर्द म्हटली की देदिप्यमान शब्द येतो…श्रध्दांजली म्हटली की आधी भावपूर्ण हा शब्द येतो…तसं स्वबळ म्हटलं की नारा हा शब्द यायलाच पाहिजे…आणि राजकारण म्हटलं की कुठला ना कुठला नारा हा आलाच…

…अरे पण नारा देण्यासाठी तो देणार्‍याकडे आधी स्वबळ असायला हवं असं किमान मला तरी वाटतं…पहिल्याने आपला अंदाज बोलून दाखवलं…

…दुसरा म्हणाला, मला नाही वाटत की हे नारा वगैरे देणारे लोक आधी आपल्याकडे स्वबळ आहे की नाही, ते चाचपून बघत असतील…

…मग नारा म्हणजे नुसतीच हुलपट्टी देतात की काय?…पहिल्याने तोंडाचा चंबू करून विचारलं…

…दुसरा म्हणाला, हुलपट्टी म्हणजे काय…सुका दमच असतो तो…

…राजकारणात तुला माहीत आहे ना, दर दोन दिवसाला कुणी ना कुणी उठतो आणि कुणाचा तरी राजीनामा मागत असतो…पहिल्याने माहिती पुरवली…

…दुसरा म्हणाला, हो हो, खरंच आहे रे…पण राजकारणात कुणी मागतो म्हणून कुणी असा व्हॉट्स अ‍ॅपवरची पोस्ट फॉरवर्ड केल्यासारखा राजीनामा देतो काय?…

…तरी पण मला कळत नाही, ही स्वबळ नावाची काय भानगड आहे?…पहिल्याने दुसर्‍याला चर्चेच्या मूळ प्रश्नावर आणलं…

…दुसरा म्हणाला, तू स्वबळ वगैरे गोष्टीत फार इंटरेस्ट घेऊ नको रे…ती एक बोलायची भाषा असते…

…अच्छा अच्छा म्हणजे ज्या कुणाकडे मुद्दलातच बळ नसतं ते स्वबळ स्वबळ करत असतात असं म्हणायच आहें की काय तुला?…पह्ल्यिाने सहज छेडून पाहिलं.

…दुसरा म्हणाला, स्वबळाचा नारा म्हणजे दोन पक्षांच्या युतीसाठी कुणीतरी करा, पण काहीतरी करा…

…पहिल्याने लागलीच वर्तमानपत्र मिटलं आणि शाळेकडे धुम ठोकली…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here