घरलोकसभा २०१९डोक्याला शॉटहिंदुराव आणि मोरूचे वडील!

हिंदुराव आणि मोरूचे वडील!

Subscribe

हिंदुराव धोंडेपाटील एका पक्षातून निघाले आणि दुसर्‍या पक्षात विसावले…खरंतर ते दुसर्‍या पक्षात विसावण्यासाठीच पहिल्या पक्षातून निघाले.

…मोरूला त्यांच्या एका पक्षातून निघण्याबद्दल काहीच आक्षेप नव्हता…पण दुसर्‍या पक्षात त्यांनी जायलाच हवं होतं का; इतका त्याचा साधा, सर्वसामान्य आणि बाळबोध प्रश्न होता…

- Advertisement -

…मोरूच्या वडिलांनी त्यांच्या कंपनीतून चांगला घसघशीत निधी मिळवून व्हीआरएस घेतली…आणि नंतर ते घरी विसावले ते विसावलेच होते…

…नंतर दुसर्‍या कोणत्याही कंपनीत त्यांना बोलवूनसुध्दा ते कधीच गेले नाहीत…म्हणूनच हिंदुराव धोंडेपाटलांना एका पक्षातून निघून दुसर्‍या पक्षात जायची गरजच काय होती, असा मोरूचा साधाभोळा सवाल होता…

- Advertisement -

…हिंदुराव धोंडेपाटलांनी एक पक्ष सोडल्यावर सरळ घरी निघून यायचं…दोन खुर्च्या समोरासमोर ठेवायच्या, एका खुर्चीवर स्वत: बसून दुसर्‍या खुर्चीवर छान पाय सोडायचे आणि निवांत आयुष्य जगायचं असं मोरूचं प्रामाणिक मत होतं…

…खरंतर हिंदुराव धोंडेपाटलांचं आणि मोरूच्या वडिलांचं वय सारखंच होतं…त्यामुळे मोरूला हा प्रश्न पडला होता…

…पण वय कितीही असलं तरी सवय तशी असावी लागते…मोरूचे वडील आणि हिंदुराव धोंडेपाटील ह्याच्यात नेमका तिथेच घोळ होता…

…मोरूच्या वडिलांनी सेवानिवृत्तीआधीच वयाचा स्विकार केला होता…हिदुराव धोंडेपाटील मात्र वय स्विकारायला तयार नव्हते आणि राजकारणात लागलेल्या सवयी सोडायला तर त्याहून तयार नव्हते…

…म्हणूनच हिंदुराव धोंडेपाटलांना एका पक्षातून दुसर्‍या पक्षात गेल्याशिवाय चालणार नव्हतं…आणि मोरूच्या वडिलांना एका कंपनीतून दुसर्‍या कंपनीत जाणं आवडणार नव्हतं…

…हिंदुराव धोंडेपाटलांच्या राजकारणातल्या ह्या अतृप्तीला त्यांचे समर्थक त्यांचा ह्या वयातला ध्येयवाद म्हणतात…मोरू मात्र आपल्या रिटायर वडिलांना सरळमार्गी माणूस अशी उपाधी देतो…

…हिंदुराव धोंडेपाटलांचे समर्थक तरीही त्यांच्या मावळतीच्या वयात त्यांना, हिंदुराव धोंडेपाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है, म्हणतात…तर मोरू मात्र त्याचे वडील संध्याकाळी घराबाहेर पडले की, संध्याकाळचे लवकर घरी या असं म्हणतो…

…हिंदुराव धोंडेपाटलांना आणि त्यांच्या मुलाबाळांना हिंदुराव अजूनही आमदार, खासदार, मंत्री, राज्यपाल होतील असं वाटतं आहे…मोरूला मात्र आपले वडील मानात जगत आहेत ह्याचंच कौतुक आहे…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -