घरलोकसभा २०१९राहूल गांधीचा भाऊच म्हणतो, राहुल २० वर्षे तरी पंतप्रधान होऊ शकत नाही

राहूल गांधीचा भाऊच म्हणतो, राहुल २० वर्षे तरी पंतप्रधान होऊ शकत नाही

Subscribe

पुढचे दोन दशकं तरी राहूल गांधी पंतप्रधान बनू शकत नाही

भाजप उमेदवार असेलेले वरूण गांधी यांनी सोमवारी इंडिया टुडे या वृत्तवाहिनी सांगितले की, कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांचे मोदींशी काहीच साम्य नाही. ३९ वर्षाचे असणारे भाजपाचे उमेदवार वरूण यांनी राहूल आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवत असताना दोघांवरही निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, दोघं भावंडांमध्ये पंतप्रधानांकडे असणाऱ्या गोष्टींशी साम्य नाहीच. तसेत पुढचे दोन दशकं तरी राहूल गांधी पंतप्रधान बनू शकत नाही किंवा तशी संधी देखील त्यांना मिळणार नाही.

राहूल गांधीवर टीकेची झोड

यावेळी, राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी पात्र आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, ”मी काही ज्योतिषी नाही. पण पुढील १० ते २० वर्ष तरी पंतप्रधान राहूल गांधी होणे शक्य नाही.” नरेंद्र मोदी यांच्या शिवाय लोकसभा निवडणुकीत मतदारांना या सर्वोच्च पदासाठी कोणीही योग्य पात्रतेचा वाटत नाही. तुमचा चुलत भाऊ राहूल गांधी मोदींशी स्पर्धा देऊ शकतील का, असे वरूण गांधीना विचारले असता.. त्यावेळी त्यांनी राहूल गांधीवर टीकेची झोड उठवली आहे.

- Advertisement -

देशाच्या विकासाकरिता भाजपाला मत

वरूण यांच्यामते, राष्ट्रीय राजकारणातील स्पर्धेत टिकून राहण्याचा स्तर उंचावत चांगली कामगिरी ते करत आहे. राजकारणात वर्तमान आणि भविष्य हे दोनच गोष्टींवर अवलंबून असते. एक म्हणजे आपली पात्रता आणि दुसरे म्हणजे जनतेशी संबध टिकवून ठेवण्याची क्षमता. एक कार्यकर्ता म्हणून मला एवढेच वाटते की, देशाच्या विकासाकरिता आपले मत भाजपाला दिले पाहिजे. ”जर मी भाजप हा पक्ष सोडला तर तो दिवस माझ्या राजकारणातील शेवटचा दिवस असेल. माझा भाजपावर पुर्ण विश्वास आहे, तसेत संबंध ही चांगले आहेत.” असे देखील वरूण गांधीने म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -