घरलोकसभा २०१९सुनेत्रा पवार यांचे ६ पैकी ४ नातेवाईक पराभूत?

सुनेत्रा पवार यांचे ६ पैकी ४ नातेवाईक पराभूत?

Subscribe

अजित पवार यांच्या पत्नी यांचे सहा नातेवाईक या निवडणुकीत उभे असले तरी त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप कधीही झाला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नात्यातील ६ लोक यावेळी लोकसभा निवडणुकीला उभे होते. मात्र त्यापैकी ४ नातेवाईकांचा पराभव जवळ दिसत आहे. सुनेत्रा पवार यांच्या नणंद सुप्रिया सुळे, मुलगा पार्थ पवार हे घरातीलच दोन उमेदवार निवडणूक लढवत होते. सुप्रिया सुळे यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे, तर पार्थ पहिल्याच प्रयत्नात पराभूत झाला आहे. पार्थच्या रुपाने पवार घराण्याने पहिल्यांदाच पराभवाचे तोंड पाहिले आहे. इतर उमेदवार देखील विजयापासून मोठ्या मताधिक्याने मागे आहेत. अर्थात अद्याप सर्व निकाल जाहीर झाले नसले तरी न भरून येणाऱ्या मताधिक्यामुळे अंदाज लावता येणे शक्य आहे.

सुनेत्रा पवार यांच्या भाची (भावाची मुलगी) कांचन कुल या नणंद सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती येथून उभ्या होत्या. घरातील दोन नातेवाईक एकाच मतदारसंघात उभे असल्याच्या दोन घटना याच निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्यासोबत घडल्या आहेत. बारामतीसहीत उस्मानाबाद मतदारसंघात देखील सुनेत्रा पवार यांचे दोन पुतणे एकमेकांसमोर भिडले. राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील यांच्याविरोधात शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचे आव्हान होते.

- Advertisement -

यासोबतच सुनेत्रा यांचा एक भाचा कुणाल पाटील हे देखील काँग्रेसकडून धुळे मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. मात्र केंद्रीय संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांच्याकडून त्यांचा पराभव झाल्याचे चित्र दिसत आहे.

सर्व नातेवाईंकाची मताची आकडेवारी

मतदारसंघ          नाव/नाते

- Advertisement -

बारामती      – सुप्रिया सुळे (नणंद)           > १ लाख ५५ हजारांचे मताधिक्य

बारामती      – कांचन कुल (भाची)           > पराभवाच्या जवळ

उस्मानाबाद  – ओमराजे निंबाळकर (पुतण्या) > १ लाख १८ हजार ६१६ मताधिक्य

उस्मानाबाद – राणा जगजितसिंह पाटील (पुतण्या) > पराभवाच्या जवळ

मावळ      – पार्थ पवार (मुलगा)                  > २ लाख १६ हजार ३४९ मतांनी मागे

धुळे        – कुणाल पाटील (भाचा)               > २ लाख २६ हजार ९४५ मतांनी मागे

 

supriya sule
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे

 

 

BJP candidate kanchan kool
कांचन कुल (भाची)
rana jagjitsinh patil and omraje nimbalkar
राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह आणि शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर
kunal patil congress dhule
धुळ्यातील काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -