घरलोकसभा २०१९लोकसभा झाली वृद्ध आणि कमी तासांची

लोकसभा झाली वृद्ध आणि कमी तासांची

Subscribe

खासदार मात्र अधिकाधिक शिक्षित

१९५२ साली पहिली लोकसभा निवडली गेल्यानंतर गेल्या ६७ वर्षांत त्यात अनेक बदल झाले आहेत. खासदारांचे सरासरी वय वाढले आहे. आता अनेक खासदार शिक्षित आहेत. मात्र संसदेच्या कामांचे तास कमी झाले आहेत. पहिल्या लोकसभेत खासदारांचे सरासरी वय ४६.५ वर्षे होते. तर २०१४ साली निवडल्या गेलेल्या लोकसभेतील खासदारांचे सरासरी वय ५६ वर्षे होते. त्यामुळे २०१४ सालचे लोकसभा सभागृह हे दुसरे सर्वात वृद्ध सभागृह होते. पहिल्या लोकसभेत ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचा एकही खासदार नव्हता. मात्र २०१४ सालच्या लोकसभेत ही संख्या ७ टक्क्यांनी वाढली. ४० वर्षे वयापेक्षा कमी वय असलेल्या खासदारांची संख्या १९५२ मध्ये २६ टक्के होती. ती २०१४ च्या लोकसभेत १४ टक्क्यांपर्यंत घसरली.

१९५२ सालच्या लोकसभेत माध्यमिक शिक्षण घेणार्‍या खासदारांची संख्या २३ टक्के होती. १६ व्या लोकसभेत सुमारे तीन चतुर्थांश खासदार हे कमीतकमी पदवीधर होते. तर ६ टक्के खासदारांनी डॉक्टरेट घेतली होती. फक्त १३ टक्के खासदार दहावी पास होते.

- Advertisement -

२०११ सालच्या जनगणनेनुसार, ६.७ टक्के भारतीय हे पदवीधर आणि त्यापेक्षा उच्चशिक्षित आहेत. तर १४.१ टक्के जनतेने दहावी पूर्ण केली आहे.

२०१४ साली नव्याने स्थापन झालेल्या ५४३ सदस्यांच्या लोकसभेत केवळ ६२ महिला होत्या. त्यांचे प्रमाण ११.४ टक्के होते. हे आतापर्यंतचे लोकसभेतील महिलांचे सर्वाधिक प्रमाण आहे. त्यातही वाढ झाली. काही खासदारांनी राजीनामा दिला तर काहींचे निधन झाल्यामुळे एकूण सदस्यांची संख्या ५२३ पर्यंत खाली आली. त्यात महिलांची संख्या मात्र वाढून ६५ किंवा १२.४ टक्के झाली.

- Advertisement -

१६ व्या लोकसभेच्या शेवटी उत्तर प्रदेशातून खासदार झालेल्या महिलांची संख्या सर्वाधिक म्हणजे १४ होती. त्यानंतर प. बंगाल (१३), महाराष्ट्र (६) अशी होती. मागील काही वर्षांत महिला खासदारांची संख्या वाढली असली तरी आपल्या शेजारील राष्ट्रे नेपाळ (२९.६ टक्के), बांगलादेश (२०.३ टक्के), पाकिस्तान (२० टक्के) यांच्यापेक्षा कमी आहे. आपण भूतान (८.३ टक्के), श्रीलंका (५.८ टक्के) यांच्या पुढे आहोत.

१६ व्या लोकसभेत कामाचे तास मात्र खाली आले आहेत. जून २०१४ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत लोकसभेचे दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात कमी कामकाज झाले. १६ व्या लोकसभेत १,६१५ तास कामकाज झाले. हे कामकाज १५ व्या लोकसभेपेक्षा २० टक्क्यांनी जास्त आहे. मात्र संपूर्ण पाच वर्षांचा कालावधी असलेल्या लोकसभेच्या सरासरी तासांपेक्षा ४० टक्क्यांनी कमी आहे. (२,६८९)

लोकसभेतील महिलांची संख्या

पहिली लोकसभा -२४
दुसरी लोकसभा -२७
तिसरी लोकसभा – ३५
चौथी लोकसभा -३०
पाचवी लोकसभा -२१
सहावी लोकसभा -१९
सातवी लोकसभा -२८
आठवी लोकसभा -४२
नववी लोकसभा -२७
दहावी लोकसभा -३७
अकरावी लोकसभा -४०
बारावी लोकसभा -४३
तेरावी लोकसभा -५२
चौदावी लोकसभा -४५
पंधरावी लोकसभा -५९
सोळावी लोकसभा -६५

सोळाव्या लोकसभेतील सर्वाधिक वयाचे खासदार
लालकृष्ण अडवाणी -८६ वर्षे

सर्वात कमी वयाचे खासदार
दुष्यंत चौताला -२६ वर्षे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -