घरमहा @२८८अहमदपूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २३६

अहमदपूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २३६

Subscribe

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर हा क्रमांक २३६ वा विधानसभा मतदारसंघ आहे.

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर हा क्रमांक २३६ वा विधानसभा मतदारसंघ आहे. येत्या निवडणुकीसाठी मतदारसंघातून सर्वच पक्षांकडून इच्छुक उमेदवारांची चांगलीच गर्दी होताना दिसत आहे. सध्या भाजपकडून विद्यमान आमदार विनायकराव पाटील, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रदेश उपाध्यक्ष दिलीपराव देशमुख, पंचायत समिती सभापती अयोध्याताई केंद्रे, अॅड. भारतभाऊ चामे यांची नावे इच्छुकांमध्ये होत आहे. तर काँग्रेसकडून डॉ. गणेश कदम, सिराज जहांगिरदार, राष्ट्रवादी कॉग्रेसकडून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार बाबासाहेब पाटील यांची नावे चर्चेत आहेत. कोणत्याही उमेदवाराला सलग दुसऱ्यांदा आमदारकीची संधी न देणारा मतदारसंघ अशी ओळख अहमदपूर मतदारसंघाची आहे. याशिवाय आता अपक्षांचा बालेकिल्ला अशीही ओळख अहमदपूरची निर्माण होत आहे. या मतदार संघात मराठा, मुस्लिम, लिंगायत, रेड्डी, दलित अशा अठरा पगड जातींचा समावेश असुन मागील इतिहास पाहता मुस्लिम व लिंगायत समाज हा निर्णायक ठरतो. ही मते ज्या पारड्यात जातील त्याचा विजय निश्चित मानला जातो.

मतदारसंघ क्रमांक – २३६

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,५४,९५३

महिला – १,३४,५१६

एकूण मतदार – २,८९,४६९

विद्यमान आमदार – विनायकराव जाधव-पाटील, अपक्ष

विनायकराव जाधव हे अहमदपूरचे विद्यमान आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबासाहेब पाटील यांना त्यांनी पराभूत केले होते. मतदार संघाचा इतिहास पाहिल्यावर १९८० चा अपवाद वगळता आजपर्यंत सतत दोन टर्म आमदारकीची संधी कोणत्याही उमेदवाराला अहमदपूरच्या जनतेने दिली नाही. हा मतदारसंघ कोणत्याही पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला नाही. प्रत्येकवेळी नव्या उमेदवाराला मतदारांनी संधी दिली. गेले तीन टर्म मतदारांनी अपक्षांनाच पाहिली पसंती दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघाची अपक्षांचा बालेकिल्ला अशी नवी ओळख निर्माण होत आहे.

vinayakrao jadhav-patil
आमदार विनायकराव जाधव-पाटील

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) विनायकराव जाधव-पाटील, अपक्ष – ६१,९५७

२) बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी – ५७,९५१

३) गणेश हाके, भाजप – ५३,९१९

४) विठ्ठल माकणे, काँग्रेस – ११,४०४

५) साजिद सय्यद, बसपा – ९,४०९

हेवाचा – ४१ – लातूर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -