घरमहा @२८८अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ३१

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ३१

Subscribe

अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व, (विधानसभा क्र. ३१) विधानसभा मतदारसंघ आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व हा क्रमांक ३१ वा विधानसभा मतदारसंघ आहे. विदर्भातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून अकोला पूर्व मतदारसंघाला ओळखले जाते. शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र नागरी वास्तव्य असलेला हा मतदारसंघ आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघातील राजकीय लढाई नेहमीच अकोला जिल्ह्याची राजकीय दिशा ठरवणारी असते. २०१४ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती तुटली. मात्र याच मतदारसंघात ही आपत्ती भाजपसाठी महत्त्वाची ठरली. युतीत शिवसेनेच्या ताब्यातील या मतदारसंघावर २०१४ मध्ये पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले. दहा वर्षांपासून भारिप-बहुजन महासंघाच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ भाजपने हिसकावला. गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघात भाजपने पकड मजबूत केली आहे.

मतदारसंघ क्रमांक – ३१

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,५७,२९३

महिला – १,४२,९८५

एकूण मतदार – ३,००,२८६

विद्यमान आमदार – रणधीर सावरकर, भाजप

शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या अध्यक्ष पदापासून आपल्या राजकीय जीवनाला रणधीर सावरकर यांनी सुरुवात केली. त्यानंतर भाजपामध्ये प्रवेश करून जिल्ह्याचे सरचिटणीस म्हणून कामगिरी पार पडली. त्यांचे राजकीय गुरू व मामा भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे यांच्या तालमीत त्यांनी राजकीय धडे गिरवले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारिप-बमसंच्या अकोला पूर्ण मतदारसंघाच्या गडाला खिंडार पाडत पहिल्या निवडणुकीतच आमदार सावरकर यांनी विजयी पताका फडकवला. विदर्भ, मराठवाड्यातील १९ जिल्ह्यातील खारपाणपट्याचा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने स्वर्गीय नानाजी देशमुख स्वावलंबन योजना राज्य शासनाने सुरू केली. या योजनेच्या महत्त्वपूर्ण समितीवर संपूर्ण राज्यातून एकमेव आमदार म्हणून रणधीर सावरकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केली. त्यानंतर विधानमंडळाच्या पंचायत राज समितीच्या सदस्यपदीसुद्धा त्यांची वर्णी लावली.

MLA randhir savarkar
आमदार रणधीर सावरकर

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) रणधीर सावरकर, भाजप – ५३,६७८

२) हरिदास भदे, भारिप – ५१,२३८

३) गोपिकिशन बाजोरिया, शिवसेना – ३५,५१४

४) डॉ. सुभाष कोरपे, काँग्रेस – ९,५४२

५) शिरीष धोत्रे, राष्ट्रवादी – ६,०८८

हे वाचा – ६ – अकोला लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -