घरमहा @२८८अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ३०

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ३०

Subscribe

अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम, (विधानसभा क्र. ३०) विधानसभा मतदारसंघ आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम हा क्रमांक ३० वा विधानसभा मतदारसंघ आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्याच्या मुख्यालयाचा मतदारसंघा पूर्णपणे शहरी असलेल्या या मतदारसंघात ३ लाख २७ हजार १३४ मतदार आहे. गेल्या पंचवीस वर्षांत अनेक राजकीय लाटा आणि वादळे आली पण या मतदारसंघावरील भाजपची पकड सैल झाली नाही. याआधी या मतदारसंघाचे नेतृत्व माजी मंत्री नानासाहेब वैराळे, जमनालाल गोयनका, अझर हुसेन आणि अरुण दिवेकर यांच्यासारख्या दिग्गजांनी केले आहे. भाजपच्या या मतदारसंघातील ताकद म्हणजे मजबूत पक्षसंघटन, कार्यकर्त्यांचे जाळे आणि या सर्वांना एका सूत्रांत बांधणारे विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा हे आहेत.

मतदारसंघ क्रमांक – ३०

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,४३,८८०

महिला – १,३२,२९६

एकूण मतदार – २,७६,१८६

विद्यमान आमदार – गोवर्धन शर्मा, भाजप

२०१४ पर्यंत बकाल शहर अशी ओळख असलेले अकोला गेल्या पाच वर्षांत काहीसे बदलताना दिसत आहे. मात्र, नागपूर, अमरावतीच्या तुलनेत अकोला विकासाच्या बाबतीत आजही माघार घेतल्याचे शल्य अकोलेकरांना आहे. सध्या दिल्लीपासून अकोल्यातील महापालिकेच्या गल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. परंतू आजही अकोला विकासासाठी आसुसलेली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघात आमदार गोवर्धन शर्मा यांची ओळख लालाजी अशी आहे. या निवडणुकीतील तिकिटांचे गणित, विरोधकांच्या आव्हानांना शर्मा कसे सामोरे जातात हे पहावं लागणार आहे.

Govardhan mangilal sharma
आमदार गोवर्धन शर्मा

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) गोवर्धन शर्मा, भाजप – ६६९३४

२) विजय देशमुख, राष्ट्रवादी – २६९८१

३) आसिफ खान, भारिप – २३९२७

४) गुलाबराव गावंडे, शिवसेना – १०५७२

५) उषाताई विरक, काँग्रेस – ९१६४

हे वाचा – ६ – अकोला लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -