घरमहा @२८८अमरावती विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ३८

अमरावती विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ३८

Subscribe

अमरावती शहर हे विधानसभा निवडणुकीच्या ३८ व्या क्रमांकाचे मतदारसंघ आहे. विशेष म्हणजे अमरावती शहर हे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

अमरावती जिल्ह्यातील अमरावती विधानसभा मतदारसंघ हा सर्वाधिक लोकवस्ती असणारा शहरी भाग आहे. अमरावती मतदारसंघाचा ३८ वा क्रमांक लागतो. त्याचबरोबर अमरावती शहर हे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. विदर्भातील महत्त्वाच्या शहरांमध्ये अमरावती शहराचा समावेश होतो. २०११ च्या जनगननेनुसार या मतदारसंघाची एकूण लोकसंख्या २,८६,०९४ आहे. मात्र, वैध मतदारांची संख्या त्यामानाने फार कमी आहे. डॉ. सुधीर पंजाबराव देशमुख हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. तर उमरलालजी मथुरादास केडिया हे या मतदारसंघाचे १९६२ सालाचे पहिले आमदार ठरले आहेत. ते काँग्रेस पक्षाचे होते. या मतदारसंघात आतापर्यंत सर्वाधिक प्रमाणात काँग्रेस पक्षाची सत्ता राहिलेली आहे. १९६२ पासून आतापर्यंत ९ वेळा काँग्रेसच्या उमेदवारांचा या मतदारसंघात विजय झाला आहे. तर भाजपला तीन वेळा या मतदारसंघात सत्ता मिळाली आहे. १९९० साली पहिल्यांदा भाजपला या मतदारसंघात सत्ता मिळाली होती. जगदीश मोतीलाल गुप्ता यांचा त्यावेळी विजय झाला होता. त्यानंतर १९९५ च्या विधानसभा निवडणुकीतही जगदीश गुप्ता यांचा पुन्हा एकदा विजय झाला होता. त्यानंतर पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. तेव्हापासून थेट २०१४ पर्यंत काँग्रेसची या मतदारसंघात सत्ता राहिली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार रावसाहेब शेखावत यांचा पराभव केला. रावसाहेब शेखावत हे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे चिरंजीव आहेत.

मतदारसंघ क्रमांक – ३८

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरुष – ८८,१२२
महिला – ७१,२०१
एकूण मतदार – १,६१, ८३६

- Advertisement -

विद्यमान आमदार – डॉ. सुनील पंजाबराव देशमुख, भाजप

डॉ. सुनील पंजाबराव देशमुख हे अमरावती विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. देशमुख याअगोदरही दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. अमरावतीच्या राजकारणात सुनील देशमुख हे मोठे नाव आहे. काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते पंजाबराव देशमुख यांचे ते चिरंजीव आहेत. ते उच्चशिक्षत आहेत. देशमुख रेडीऑलॉजीस्ट असून एम.बी.बी.एस आणि एम.डी. पदवीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले आहे. विद्यार्थी दशेपासूनच ते राजकारणात सक्रीय आहेत. १९८१ ते १९८२ पर्यंत ते विद्यार्थी परिषद नागपूर विद्यापीठाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच ते काँग्रेस पक्षात होते. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे ते सचिव राहिले आहेत. त्याशिवाय १९९६ ते ९७ ते अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. १९९९ साली त्यांना काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी देशमुख निवडून आले होते. त्यानंतर २००४ साली देखील काँग्रेसच्या तिकिटावर सुनील देशमुख निवडून आले. विशेष म्हणजे नोव्हेंबर २००४ ते नोव्हेंबर २००८ देशमुख जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, वित्त व नियोजन व संसदीय कार्य खात्यांचे राज्यमंत्री होते. साधारणत: ३० ते ३५ वर्षे काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहिल्यानंतर काही कारणास्तव त्यांनी भाजप पक्षात पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला. २०१४ साली त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आणि डॉ. सुनील देशमुख निवडून आले. त्यामुळे आतापर्यंत ते तीन वेळा या मतदारसंघाचे आमदार झाले आहेत.

dr. sunil deshmukh
अमरावतीचे विद्यमान आमदार डॉ. सुनील पंजाबराव देशमुख

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) डॉ. सुनील पंजाबराव देशमुख, भाजप – ८४,०३३
२) रावसाहेब शेखावत, काँग्रेस – ४८,९६१
३) श्रीमती मिर्झा नईम अख्तर बेग, बहुजन समाज पक्ष – ११,५८५
४) प्रदीप बाजड, शिवसेना – ८,२५६

हेही वाचा – ७ – अमरावती लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -