अरमोरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ६७

गडचिरोली जिल्ह्यात अरमोरी विधानसभा मतदारसंघ (विधानसभा क्र. ६७) आहे.

armori assembly constituency
अरमोरी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ६७

अरमोरी विधानसभा मतदारसंघ हा गडचिरोली जिल्हात आहे. अरमोरी शहर हे वैनगंगा नदीकाठी वसलेले आहे. हे शहर जिल्ह्याचे मुख्य केंद्र आहे. २०११च्या जनगननेनुसार अरमोरीची लोकसंख्या ही ९७ लाख ९७ इतकी आहे. अरमोरी विधानसभा मतदारसंघ हा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात येतो.

मतदारसंघ क्रमांक – ६७

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जमाती

मतदारांची संख्या
पुरुष – १,२२,३८६
महिला – १,१६,५५१
एकूण मतदार – २,३८,९३७

विद्यमान आमदार – कृष्णा दमाजी गजबे, भाजप

mla krushna gajbe
विद्यमान आमदार कृष्णा गजबे

कृष्णा गजबे हे अरमोरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २०१४ साली त्यांनी पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा विजय झाला.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) कृष्णा गजबे, भाजप – ६०, ४१३
२) आनंदराव गेडाम, काँग्रेस – ४७,६८०
३) श्रीमती कोमल बारसागडे, बसप – १५,६९७
४) रामकृष्ण मडावी, शिवसेना – १४,२२४
५) जयेंद्रसिंह चंदेल, अपक्ष – ९४९०


हेही वाचा – १२ – गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ