घरमहा @२८८आर्णी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ८०

आर्णी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८०

Subscribe

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी (विधानसभा क्र. ८०) विधानसभा मतदारसंघ आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. अनुसूचित जमातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. आर्णी हा पुर्वी केळापूर मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे येथून ५ वेळा विजयी झाले आहेत. तर दोन वेळा त्यांना याच मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता.

आर्णी मतदारसंघात घाटंजी, पांढरकवडा आणि आर्णी असे तीन तालुके येतात. आर्णी मतदारसंघात शेतकऱ्यांना सिंचनाची सोय नाही, आदिवासी समाज इथे प्रामुख्याने आहे. मात्र त्यांच्या विकास प्रकल्पाच्या योजना रखडल्या आहेत. घरकुल योजना नाही. उद्योगधंदे नाहीत. रस्त्यांची अवस्था वाईट आहे. काँग्रेसचे शिवाजीराव मोघे २५ वर्षांपासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्याकडे मंत्रीपदही अनेक वर्ष होते, मात्र तरिही त्याचा मतदारसंघाच्या विकासासाठी काहीही फायदा झाला नसल्याचे येथील लोक सांगतात.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – ८०

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जमाती

- Advertisement -

मतदारांची संख्या
पुरुष – १,५०,२५४
महिला – १,३७,१६०

एकूण मतदान – २,८७,४१४

विद्यमान आमदार – राजू तोडसाम, भाजप

आर्णीचे आमदार राजू तोडसाम हे २०१४ साली पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. राजू तोडसाम यांची कारकिर्द दोन कारणांसाठी विशेष गाजली. एक म्हणजे त्यांनी कंत्राटदाराला फोनवर पैसे मागितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर एका जाहीर कार्यक्रमात तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली होती. त्याचाही व्हिडिओ समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल झाला होता. तोडसाम यांचे द्विभार्या प्रकरण चांगलेच गाजले, त्यानंतर त्यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, अशीही मागणी समोर आली होती.

तोडसाम हे २००९ साली भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या संपर्कात आले. त्यानंतर २०१० साली त्यांची आर्णी तालुका अध्यक्ष म्हणून वर्णी लागली. सुरुवातीला पोलीस ठाण्यात जाणाऱ्या लोकांना अर्ज लिहून देणे, लोकांची प्रशासकीय कामे करुन देणे, अशा प्रकारची कामे तोडसाम करत होते. २०१४ साली चंद्रपूर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर तोडसाम यांची विधानसभेच्या उमेदवारीची लॉटरी लागली होती.

Arni MLA Raju Todsam
आमदार राजू तोडसाम

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) राजू तोडसाम, भाजप – ८६,९९१
२) अॅड. शिवाजी मोघे, काँग्रेस – ६६,२७०
३) डॉ. संदिप धुर्वे, शिवसेना – ३०,९६०
४) रंजिता शिंदे, बसपा – ४,१९७
५) डॉ. विष्णू उकंडे, राष्ट्रवादी – २,९७२


हे वाचा – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -