घरमहा @२८८औसा विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २३९

औसा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २३९

Subscribe

लातूर जिल्ह्यातील औसा (विधानसभा क्र. २३९) विधानसभा मतदारसंघ आहे.

लातूर जिल्ह्यातील औसा हा क्रमांक २३९ वा विधानसभा मतदारसंघ आहे. काही दिवसांपासून औसा विधानसभा मतदारसंघा राजकीयदृष्ट्या चर्चेत्या केंद्रस्थानी आला आहे. एकापेक्षा एक प्रगल्भ, दूरदृष्टीच्या नेत्यांनी प्रतिनिधित्व केलेला औसा हा लातूर जिल्ह्यातील राजकीय, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, कृषी विशेष वैशिष्ट्यपूर्ण राहिलेला आहे. तरीही कायम दुर्लक्षित मतदारसंघा असाही औसा मतदारसंघाची ओळख आहे. वारकरी संप्रदायाची पताका अविरत फडकवत ठेवणाऱ्या नाथपीठाचा वारसा लाभलेला औसा हा भौगोलिकदृष्ट्या लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. राजकीयदृष्ट्या काँग्रेस विचारसरणीने भारलेला परिसर आहे.

मतदारसंघ क्रमांक – २३९

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,३७,७३६

महिला – १,१९,३९४

एकूण मतदार – २,५७,१३०

विद्यमान आमदार – बसवराज पाटील, काँग्रेस 

उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूमचे मूळ रहिवासी बसवराज पाटील हे गेल्या दहा वर्षांपासून औसाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव अभिमन्यू पवार यांनी आव्हान दिले आहे. पवारांचे राजकीय विरोधक आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील यांच्या गटाकडून भूमीपुत्राचा मुद्दा उचलण्यात आला आहे. औसा विधानसभा मतदारसंघाची जागा युतीत शिवसेनेकडे आणि आघाडीत काँग्रेसकडे असते. गेल्या वेळी युती मोडली तशी आघाडीही तुटली. शिवसेनेने १९९९ आणि २००४ असे दोनवेळा दिनकर माने यांच्या माध्यमातून आपली पकड बसवली. माने यांच्या विजयात तत्कालीन परिस्थितीतील राजकीय समीकरणे आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मोठा सहभाग राहिला. माने हे विलासरावांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून देत सर्वा प्रकारनचे बळ पुरवत देशमुख गटाने शिवराज पाटील चाकूरकर गटाच्या मुजीबुद्दीन पटेल यांचा पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लातूर जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत राजकारण, चाकूरकर-देशमुख गटातील सुप्त संघर्ष, जातीच्या राजकारणात देशमुख गट औसा तालुक्यात वरचढ ठरला.

basavraj patil
आमदार बसवराज पाटील

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) बसवराज पाटील, काँग्रेस – ६४,२३७

२) दिनकर माने, शिवसेना – ५५,३७९

३) पाशा पटेल, भाजप – ३७,४१४

४) बालाजी गिरे, मनसे – ५,९२९

५) राजेश्वर बुके, राष्ट्रवादी – ४,९४६

हे वाचा – ४० – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -