बदनापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १०२

जालना जिल्ह्यातील बदनापूर (विधानसभा क्र. १०२) विधानसभा मतदारसंघ आहे.

Jalna
badnapur assembly constituency
बदनापूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १०२

जालना जिल्ह्यातील बदनापूर हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा अंबड, बदनापूर आणि भोकरदन असा तीन तालुक्यामध्ये विस्तारलेला मोठा मतदारसंघ आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला जालना जिल्ह्यातील हा एकमेव मतदारसंघ आहे. २०१४ साली भाजप – शिवसेनेने युती तोडल्यानंतर स्वतंत्रपणे निवडणुका लढल्यामुळे नारायण कुचे हे औरंगाबादहून बदनापूरला आले अवघ्या तेरा दिवसांच्या प्रचारावर ते बदनापूरचे आमदार झाले.

२००४ चा अपवाद वगळला तर बदनापूर मतदारसंघात सुरुवातीपासूनच शिवसेना – भाजपचे वर्चस्व राहिलेले आहे. शिवसेनेचे नारायण चव्हाण हे ३ वेळा तर संतोष सांबरे हे २ वेळा विजयी झालेले आहेत. २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या अरविंद चव्हाण यांनी या मतदारसंघात बाजी मारली होती.

मतदारसंघ क्रमांक – १०२

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती

मतदारांची संख्या
पुरुष – १,४७,०२६
महिला – १,२९,७११
एकूण मतदान – २,७६,७३७

विद्यमान आमदार – नारायण कुचे, भाजप

रावसाहेब दानवे यांचे कट्टर समर्थक म्हणून नारायण कुचे यांचा उल्लेख केला जातो.
२०१४ साली युती तुटल्यामुळे बदनापूर मतदारसंघात उमेदवार शोधण्यासाठी भाजपला बरीच पळापळ करावी लागली. शेवटच्या क्षणी रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादहून नारायण कुचे यांना आयात केले. कुचे हे औरंगाबाद महानगरपालिकेत नगरसेवक होते. युती तुटल्यामुळे कुचे यांची अक्षरशः लॉटरी लागल्याचे सांगितले जाते.

मात्र २०१४ नंतर कुचे यांच्या राजकारणात बरेच बदल झाल्याचे बोलले जाते. दानवे यांच्या छत्रछायेखाली फारकाळ टिकता येणार नाही, याची उपरती त्यांना झाली आहे. म्हणूनच आपली आमदारकी टिकवण्यासाठी कुचे यांनी स्वतंत्रपणे कामाला सुरुवात केली आहे.

Badnapur MLA Narayan kuche
बदनापूरचे आमदार नारायण कुचे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) नारायण कुचे, भाजप – ७३,५६०
२) रुपकुमार चौधरी, राष्ट्रवादी – ५०,०६५
३) संतोष सांबरे, शिवसेना – ३०,९४५
४) सुभाष मगरे, काँग्रेस – १३,००७
५) ज्ञानेश्वर गायकवाड, मनसे – ६,६४५


हे वाचा – जालना लोकसभा मतदारसंघ