घरमहा @२८८बागलाण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. : ११६

बागलाण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. : ११६

Subscribe

नाशिक जिल्ह्यातील बागलाण (विधानसभा क्र.११६) विधानसभा मतदारसंघ आहे.

नाशिक जिल्ह्यातील बागलाण हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. हा मतदारसंघ अनुसूचीत जमातीसाठी सोडण्यात आला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत या मतदारसांघात भाजपला खूप फायदा झाल्याचे चित्र होते. परिणामी, नगारपरिषद, पंचायत समिती यांमध्ये भाजपचा वरचष्मा राहिला आणि साहजिकच या ठिकाणी राष्ट्रवादीची पिछेहाट झाली. बागलाण म्हणजे देवमामलेदार यांच्या वास्तव्याने पावन झालेला सटाना तालुका होय.चव्हाण आणि बोरसे कुटुंबियांचे वर्चस्व याठिकाणी असल्याने आलटून पालटून सत्ता मिळविण्यात त्यांना यश लाभलेले आहे.

मतदार संघ क्रमांक : ११६

- Advertisement -

मतदार संघ आरक्षण : अनुसूचीत जमाती

मतदारांची संख्या
पुरुष – १,४४,४५४
महीला – १,३१,५६६
तृतीयपंथी – १
एकुण मतदार २,७६,०२१

- Advertisement -

विदयमान आमदार : दीपिका चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पत्नी दीपिका चव्हाण या राष्ट्रवादी कडून निवडणुकीला उभ्या राहिल्या आणि निवडून देखील आल्या. संपूर्ण राज्यात मोदी लाटेचा प्रभाव असताना देखील भाजपच्या उमाजी बोरसे यांचा पराभव करत विजयाची माळ गळ्यात टाकली. या पूर्वी नगरपरिषद, पंचायत समिति, बाजार समिति मध्ये संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची सत्ता होती.

बागलाण विधानसभा मतदारसंघ आमदार दीपिका चव्हाण

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीची परीस्थिती

दीपिका चव्हाण – राष्ट्रवादी कॉंग्रेस – ६८,४३४
दिलीप बोरसे – भाजप – ६४,२५३
साधना गवळी – शिवसेना – ९,१०८


हे ही वाचा –  धुळे लोकसभा मतदारसंघ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -