घरमहा @२८८बार्शी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २४६

बार्शी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २४६

Subscribe

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी (विधानसभा क्र. २४६) विधानसभा मतदारसंघ आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हा क्रमांक २४६ वा विधानसभा मतदारसंघ आहे. बार्शी विधानसभेचा १९६२ पासूनचा इतिहास पाहिला तर बार्शी विधानसभेवर फक्त एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा जास्त बोलबाला राहिलेला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीला जरी एक ते दीड वर्षे अवधी असला तरी सध्या तालुक्यात मोर्चेबांधणीला वेग आलेला आहे. ही निवडणूक पारंपारिक सोपल-राऊत गटात होणार हे जवळजवळ निश्चित आहे. बार्शीचा मागील इतिहास पाहिला तर प्रत्येक विधानसभेला निवडून येणारा उमेदवार हा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या चिन्हावर निवडून आलेला आहे.

मतदारसंघ क्रमांक – २४६

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,५२,९१८

महिला – १,३८,०४९

एकूण मतदार – २,९०,९६७

विद्यमान आमदार – दिलीप सोपल, राष्ट्रवादी

२०१४ विधानसभा निवडणूकीत निर्णय घेतला. शिवसेना कडून राजेंद्र राऊत, राष्ट्रवादी कडून विद्यमान आमदार दिलीप सोपल तर भाजप कडून प्रथमच निवडणूक लढविणारे राजेंद्र मिरगणे उमेदवार होते. या निवडणूकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप सोपल ९७ हजार ६५५ मते यांनी शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र राऊत ९२ हजार ५४४ मते पुन्हा एकदा पराभव करून सहाव्यांदा विधानसभेवर जाण्याचा विक्रम केला. शिवसेनेचे राजेंद्र राऊत आणि भाजपचे राजेंद्र मिरगणे यांची मत विभागणी झाली राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधी लाट असूनही आमदार दिलीप सोपल यांनी आपला गड कायम राखला. सध्याची बार्शीच्या राजकारणातील स्थिती पाहिली तरतर गेल्या चार वर्षात अनेक बदल घडून आले शिवसेनेचे माजी आमदार यांनी शिवसेना सोडली आणि भाजप मध्ये प्रवेश केला.

Dilip sopal
आमदार दिलीप सोपल

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) दिलीप सोपल, राष्ट्रवादी – ९७,६५५

२) राजेंद्र राऊत, शिवसेना – ९२,५४४

३) राजेंद्र मिरगणे, भाजप – १६,५०६

४) गणेश शिंदे, बसपा – १,७५२

५) सुधीर गाढवे, काँग्रेस – १,६५४

हेवाचा – ४० – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -