घरवसमत विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ९२
Array

वसमत विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ९२

Subscribe

हिंगोली जिल्ह्यातील वसमत (विधानसभा क्र. ९२) विधानसभा मतदारसंघ आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. वसमत विधानसभा मतदारसंघ हा पुर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. कधीकाळी या मतदारसंघावर शिवसेनाचा ताबा होता. मात्र २००४, २००९ साली राष्ट्रवादीच्या जयप्रकाश दांडेगावकर यांनी वसमतवर विजय मिळवला होता. मात्र २०१९ साली शिवसेनेने पुन्हा एकदा या मतदारसंघावर विजय प्राप्त केला.

मतदारसंघ क्रमांक – ९२

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,३८,९८८
महिला – १,२४,४१०
एकूण मतदान – २,६३,३९८

- Advertisement -

विद्यमान आमदार – जयप्रकाश मुंदडा, शिवसेना

मराठवाड्यातील शिवसेनेचा चेहरा म्हणून डॉ. जयप्रकाश मुंदडा यांची ओळख आहे. युती सरकारच्या काळात मुंदडा यांच्याकडे सहकार खाते होते. तीस वर्षांपासून त्यांचे वसमत विधानसभेवर एकहाती वर्चस्व होते. २००४ आणि २००९ साली त्यांचा राष्ट्रवादीच्या जयप्रकाश दांडेगावकर यांनी पराभव केला होता. मात्र २०१९ साली पुन्हा एकदा त्यांनी वसमतमधून निवडून येण्याची किमया साधली.

Jaiprakash Mundada
आमदार जयप्रकाश मुंदडा

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) जयप्रकाश मुंदडा, शिवसेना – ६३,८५१
२) जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रवादी – ५८,२९५
३) अॅड. शिवाजीराव जाधव, भाजप – ५१,१९७
४) अब्दुल हाफिज अब्दुल रेहमान, काँग्रेस – १३,३२५
५) अॅड. इफ्तेकार जब्बार शेख, भारिप – ३९५६


हे वाचा – हिंगोली लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -