भोकरदन विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १०३

जालना जिल्ह्यातील भोकरदन (विधानसभा क्र. १०३) विधानसभा मतदारसंघ आहे.

Jalna
bhokardan assembly constituency
भोकरदन विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १०३

जालना जिल्ह्यातील भोकरदन हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. जालना जिल्ह्यातील इतर मतदारसंघासोबतच भोकरदनचीही चर्चा राज्यभर होते. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या मतदारसंघातून त्यांचे पुत्र संतोष दानवे हे आमदार आहेत. भोकरदन हा मुख्यत्वे शेतीवर अवलंबून असलेला ग्रामीण मतदारांचा मतदारसंघ आहे.

जालना जिल्हा निर्माण होण्याअगोदर भोकरदन तालुका औरंगाबादमध्ये होता. १९९० मध्ये रावसाहेब दानवे पहिल्यांदा भोकरदनमध्ये आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी २००३ पर्यंत आपले वर्चस्व कायम ठेवले होते. मात्र २००३ साली पोटनिवडणुकीत चंद्रकांत दानवे विरुद्ध रावसाहेब दानवे असा संघर्ष सुरु झाला. या संघर्षामध्ये चंद्रकांत दानवे यांनी बाजी मारली. त्यानंतर १२ वर्ष त्यांनी आपले वर्चस्व राखले.

२०१४ च्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी आपला मुलगा संतोष दावनेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि पुन्हा एकदा भोकरदनमध्ये विजय मिळवला. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून चंद्रकांत दानवे पुन्हा निवडणूक लढवतील, अशी चिन्ह दिसत आहेत. मात्र यावेळी जर शिवसेना-भाजप युती झाल्यास त्यांची वाट आणखी बिकट होऊ शकते. तसेच वंचित बहुजन आघाडी कोणता उमेदवार देतो, त्यावरूनच भोकरदनचा भावी आमदार कोण? हे ठरू शकते.

मतदारसंघ क्रमांक – १०३

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,४२,९७७
महिला – १,२५,०९८
एकूण मतदान – २,६८,०७६

विद्यमान आमदार – संतोष दानवे, भाजप

संतोष दानवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आहेत. २०१४ साली भोकरदन मतदारसंघातून ते पहिल्यांदा निवडून आले. २००५ साली संतोष दानवे मित्रमंडळ स्थापन करुन त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. २०११ मध्ये त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्षपद भूषविले होते. रावसाहेब दानवे यांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. संतोष दानवे यांनी आता २०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मतदारसंघात मतदारांशी संवाद साधणे, सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणे, भेटीगाठी घेणे अशाप्रकारच्या कामांना त्यांनी सुरुवात केली आहे.

bhokardan mla santosh danve
आमदार संतोष दानवे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) संतोष दानवे, भाजप – ६९,५९७
२) चंद्रकांत दानवे, राष्ट्रवादी – ६२,७६०
३) रमेश गव्हाड, शिवसेना – ३६,२९८
४) सुरेश गवळी, काँग्रेस – ५,२७७
५) शफिक खान पठाण, अपक्ष – ४,७६२


हे वाचा – जालना लोकसभा मतदारसंघ