घरमहा @२८८बोईसर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३१

बोईसर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३१

Subscribe

पालघर जिल्ह्यातील बोईसर (विधानसभा क्र. १३१) विधानसभा मतदारसंघ आहे.

पालघर जिल्ह्यातील बोईसर हा क्रमांक १३१ चा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एकूण ३३४ मतदान केंद्र आहेत. तसेच आदिवासी, कुणबी आणि वंजारी मतदार या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांसह, भूमीपूत्र आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक समस्यांनी हा मतदारसंघ घेरलेला आहे. बोईसर विधानसभा मतदारसंघ हा बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात असलेला मतदारसंघ असून विविध विकास कामे केल्याचा दावा जरी विद्यमान आमदारांकडून केला जात असला तरीही आजही हा मतदारसंघ मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप स्थानिक मतदार आणि विरोधकांकडून केला जात आहे. २०१४ च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीकडून पुन्हा विलास तरे निवडून आले आणि त्यांनी शिवसेनेच्या कमलाकर दळवी यांचा पराभव केला. तर भाजपमधून निवडणूक लढवत जगदीश धोडी ती क्रमांकावर राहिले.


मतदारसंघ क्रमांक – १३१

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जमाती


मतदारांची संख्या

पुरुष –, ३६, ४४४

- Advertisement -

महिला –, १५, ९३९

एकूण मतदार –, ५२, ४११


विद्यमान आमदार – विलास सुकूर तरे

विलास तरे हे बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. बोईसर विधानसभा या राखीव मतदारसंघातून ते दोन वेळा आमदार म्हणून निवडून गेले आहेत. २००९ मध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला उमेदवारी अर्ज सादर करताना आपली शैक्षणिक पात्रता दहावी असल्याचे नमूद केले होते. १९९५ साली पुणे विद्यापीठातून दहावी झाल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्यानंतर ते २०१४ मध्ये पुन्हा याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले. यावेळी आपण १९९२९३ या वर्षांत पालघर जिल्ह्यातील दहिसर येथील गिरीजन शाळेतून दहावी झाल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. पहिल्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी १९९५ मध्ये पुण्यातून तर दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात पालघरमधून दहावी झाल्याचे नमूद केले असल्याने त्यांच्या शैक्षणिक अर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी बविआला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचं शिवबंधन हातात बांधलं आहे. तरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सेनेत प्रवेश केला.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • विलास तरे, बहुजन विकास आघाडी ६४,५५०
  • कमलाकर दळवी, शिवसेना ५१, ६७७
  • जगदीश धोडी, भारतीय जनता पक्ष – ३०, २२८
  • सुनील धानव, अपक्ष – ५, ७०२
  • वसंत रावते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना , ५०३

नोटा –, १२६

मतदानाची टक्केवारी –६७.८६


हेही वाचा – २२ – पालघर लोकसभा मतदारसंघ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -