घरमहा @२८८भायखळा विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १८४

भायखळा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १८४

Subscribe

भायखळा (विधानसभा क्र. १८४) हा मुंबई शहरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

मुंबई शहरातल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातला हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. आधी माजगावचा भाग असलेला हा मतदारसंघ मुस्लीम बहुल मतदारांमध्ये कायमच चर्चेत राहिला आहे. काँग्रेसनं आत्तापर्यंत या मतदारसंघावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं. मात्र, २०१४मध्ये एमआयएमचे वारीस पठाण यांनी काँग्रसचं हे प्रस्थ मोडून काढत या मतदारसंघातून विजय मिळवला. कुख्यात आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम याचा डोंगरी परिसर देखील याच मतदारसंघात येतो. भायखळा मतदारसंघात येणाऱ्या भागाचा विकास अजूनही दृष्टीपथात नसताना देखील या मतदारसंघातून जे कुणी आमदार निवडून जातात, त्यांना यावर तोडगा काढता आलेला नाही. या मतदारसंघात एकूण २४७ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १८४

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,२३,६१६
महिला – १,०३,५२०

- Advertisement -

एकूण मतदार – २,२७,१४३


Waris Pathan
वारीस पठाण

विद्यमान आमदार – अॅड. वारिस पठाण, एमआयएम

मूळचे सुशिक्षित असलेले वारीस पठाण एमआयएम या वादग्रस्त पक्षामुळे कायमच वादात आणि त्यामुळेच चर्चेत असतात. विशेषत: त्यांच्या आक्रमक भूमिकांमुळे. नुकताच काश्मीरमधील कलम ३७०वरच्या भूमिकेमुळे त्यांना मुंबई पोलिसांनी अटकाव घातल्याची देखील चर्चा होती. वारीस पठाण मतदारसंघात कमी आणि टीव्हीवर जास्त दिसतात अशी त्यांच्याविषयी त्यांच्याच मतदारसंघातून कायम टीका केली जाते. एमआयएम या पक्षाचा मुंबईतील चेहरा म्हणून वारीस पठाण यांच्याकडे पाहिले जाते.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) अॅड. वारिस पठाण, एमआयएम – २५,३१४
२) मधु चव्हाण, भाजप – २३,९५७
३) मधु चव्हाण, काँग्रेस – २२,०२१
४) गीता गवळी, अभासे – २०,८९५
५) संजय नाईक, मनसे – १९,७६२

नोटा – १६२०

मतदानाची टक्केवारी – ५४.८३ %


हेही वाचा – दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -