घरमहा @२८८चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ - म.क्र.१७

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ – म.क्र.१७

Subscribe

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव (विधानसभा क्र.१७) विधानसभा मतदारसंघ आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. इथे कृषी उत्पन्नावर आधारित बेलगंगा साखर कारखाना, चाळीसगाव कापड गिरणी, तेल व विड्यांचे कारखाने इ. इतर उद्योगांना चालना देण्याकरता इथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे चाळीसगाव उद्योग क्षेत्र आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमधील मतदार निर्णायक भूमिका ठरवीत असतात.

मतदारसंघ क्रमांक : १७

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण : खुला

मतदारांची संख्या
पुरुष : १,८१,०५१
महिला : १,६०,३८६
तृतीयपंथी : १९
एकूण मतदान ३,४१,४५६

- Advertisement -

विद्यमान आमदार : उन्मेष पाटील, भाजप

चाळीसगाव विधानसभा क्षेत्र हे राखीव असतांना भाजपाकडे होता.हे विधानसभा क्षेत्र खुल्या वर्गासाठी झाल्यावर या विधानसभा क्षेत्रातुन राष्ट्रवादीचे माजी आ. राजीव देशमुख यांनी भाजपाची सत्ता असलेल्या क्षेत्रात आपला पाय रोवला होता.मात्र 2014 मध्ये उन्मेश पाटील यांनी राजीव देशमुख यांना धुळ चारून हा मतदारसंघ पुन्हा भाजपाकडे आणला.याचबरोबर विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी देशमुख घराण्याचे वर्चस्व असलेल्या नगर पालिकेवर सुध्दा भाजपाचा झेडा फडकविला.

उन्मेष पाटील हे आपल्या पत्नी संपदा पाटील यांना या मतदारसंघातून तिकीट मिळविण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. तर दुसरीकडे खासदार पाटील याचे व्यवसायिक पार्टनर व जिवलग मित्र मंगेश चव्हाण हे सुध्दा निवडणुकीच्या शर्यतीमध्ये आहे. भाजपाचे प्रभारी जिल्हध्यक्ष डॉ.सजीव पाटील हे सुध्दा शर्यतीत आहे.

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ आमदार उन्मेष पाटील

२०१४ विधानसभा निवडणुकीची परिस्थिती

उन्मेष पाटील – भाजप – ९४,१५९
राजीव देशमुख – राष्ट्रवादी – ७१,३६४
रमेश गुंजाळ – अपक्ष – २५,६१०


हे देखील वाचा – जळगाव लोकसभा मतदारसंघ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -