घरमहा @२८८चंदगड विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २७१

चंदगड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७१

Subscribe

चंदगड विधानसभा मतदार संघ हा कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील एक प्रमुख विधानसभा मतदार संघ आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील चंदगड हा एक महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ आहे. चंदगड तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. चंदगड हा महाराष्ट्रातील एक दुर्गम आणि मागास राहिलेला तालुका म्हणून सर्वपरिचित आहे. राजकीयदृष्ट्या हा तालुका महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा तालुका (मतदार संघ) म्हणून ओळखला जातो.

मतदारसंघ क्रमांक – २७१

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या 

पुरूष – १,५०,९४६
महिला – १,४८,३६०
एकूण – २,९९,३०६

- Advertisement -

विद्यमान आमदार – संध्यादेवी कृष्णराव देसाई-कुपेकर

Sandhyadevi-kupekar
विद्यमान आमदार – संध्यादेवी कृष्णराव देसाई-कुपेकर

संध्यादेवी कृष्णराव देसाई-कुपेकर ह्या चंदगड मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत. विधानसभेचे दिवंगत सभापती बाबासाहेब कुपेकर यांच्या त्या पत्नी होत. कुपेकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी संध्यादेवी यांना उमेदवारी देण्यात आली. त्या वेळी संध्यादेवी ३० हजार मतांनी विजयी झाल्या. त्या निवडणूकीत शिवसेनेचे नरसिंगराव पाटील यांचा त्यांनी पराभर केला होता. संध्यादेवींना सामाजिक कार्याची आवड आहे.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) संध्यादेवी देसाई-कुपेकर, राष्ट्रवादी काँग्रेस – ५१,५९९
२) नरसिंगराव पाटील, शिवसेना – ४३,४००
३) विनायकराव पाटील, अपक्ष – २८,८४७
४) भरमू सुबराव पाटील, काँग्रेस – २५,९६४
५) संग्राम कुपेकर, जनसुराज्य – २५,८४४


हेही वाचा – सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -