घरमहा @२८८चांदिवली विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १६८

चांदिवली विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १६८

Subscribe

चांदिवली (विधानसभा क्र. १६८) हा मुंबई उपनगरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

एकूण मतदारांच्या संख्येचा विचार करता हा मतदारसंघ आख्ख्या मुंबईतला सर्वात मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात इथे ४ लाखांहून अधित मतदार आहेत. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांचं प्रमाण अधिक आहे. चांदीवलीमध्ये आयटी कंपन्यांची संख्या मोठी आहे. मात्र, तरी देखील इथल्या नागरी सुविधांचा प्रश्न अजूनही कायम आहे. या मतदारसंघात एकूण ४१५ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १६८

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – २,४६,६७२
महिला – १,७१,०२८

- Advertisement -

एकूण मतदार – ४,१७,७००


Naseem Khan
नसीम खान

विद्यमान आमदार – नसीम खान, काँग्रेस

१९८८ सालापासून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले नसीम खान या मतदारसंघातून सलग ४ वेळा विधानसभेत निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांची हक्काची वोटबँक या मतदारसंघात तयार झाली आहे. मात्र, असं असून देखील त्यांना इथल्या नागरी समस्या पूर्णपणे सोडवता आलेल्या नाहीत. काँग्रेसच्या पक्ष संघटनेमध्ये दीर्घ काळ काम केल्यानंतर १९९९मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. तसेच, काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी विविध खात्यांचे मंत्री म्हणून देखील कार्यभार पाहिला आहे.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) आरिफ खान, काँग्रेस – ७३,१४१
२) रामनिवास सिंघे, शिवसेना – ४३,६७२
३) इश्वर तायडे, मनसे – २८,६७८
४) अण्णामलाई एस., अपक्ष – २०,२६६
५) शरद पवार, राष्ट्रवादी – ९७४०

नोटा – ४६५३

मतदानाची टक्केवारी – ४४.३२ %


हेही वाचा – मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -