चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७१

चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेला (विधानसभा क्र. ७१) विधानसभा मतदारसंघ आहे.

Chandrapur
chandrapur assembly constituency
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ७१

चंद्रपूर शहर अनुसूचित जातीतील उमेदवारासाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. विदर्भाचे पॉवर हब म्हणून चंद्रपूरकडे पाहिले जाते. कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या या मतदारसंघात ३ लाख ५८ हजार २५० मतदार आहेत.

मतदारसंघ क्रमांक – ७१

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती

मतदारांची संख्या
पुरुष – १,०३,७१२
महिला – ८९,८८९

एकूण मतदान – १,९५,११५

विद्यमान आमदार – नानाजी सिताराम शामकुळे, भाजप

दलित चळवळ आणि रिपब्लिकन पक्षातून राजकीय कारकीर्द सुरू करणारे नाना शामकुळे हे चंद्रपूर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. १९८५ मध्ये पहिल्यांदा नागपूर महापालिकेत खोरिपचे नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. नागपूर महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. २००४ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २००९ साली त्यांना राखीव असलेल्या चंद्रपूर मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळाली. तिथून ते पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर २०१४ सालीही त्यांनी आपला गड कायम राखला. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चा संघटनेचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी भुषविले होते. वाचन आणि समाजिक कार्याची त्यांना आवड आहे. एम.ए. पर्यंत शिक्षण पुर्ण केलेले आहे.

mla nanaji shamkule
चंद्रपूरचे आमदार नानाजी शामकुळे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) नानाजी शामकुळे, भाजप – ८१,४८३
२) किशोर जोरगेवार, शिवसेना – ५०,७११
३) महेश मेंढे, काँग्रेस – २५,१४०
४) अनिरुद्ध वनकर, भारिप बहुजन महासंघ – १४,६८३
५) अंकलेश खैरे, बसपा – ८,३५७

हे वाचा – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ