घरमहा @२८८चिखली विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २३

चिखली विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २३

Subscribe

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली (विधानसभा क्र. २३) विधानसभा मतदारसंघ आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली हा क्रमांक २३ वा विधानसभा मतदारसंघ आहे. चिखली हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. चिखली तालुक्यातील हे चिखली नावाचे गाव जालना – खामगाव या मार्गावर आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाची ओळख म्हणजे नागपूरनंतर विदर्भात प्रभावी केंद्र म्हणून चिखली ओळखले जाते. हे जरी खरं असल तरी भाजपाच्या या मतदारसंघात तीन वेळा विजय वगळता काँग्रेसचे वर्चस्व या मतदारसंघात बघायला मिळते. भाजपच्या अंतर्गत बंडाळीमुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे हे २००९ आणि २०१४ निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवू शकले. यंदाही चिखली विधानसभेत भाजपच्या गटात उमेदवारांची मोठी यादी असली तरी फारशी वेगळी परिस्थिती दिसत नाही. अंतर्गत बंडाळीमुळे आमदार राहुल बोंदे यांच्या विजयाची हॅटट्रिक सुकर होईल की यंदा मोदीलाटेचा प्रभाव कामी येईल हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

मतदारसंघ क्रमांक – २३

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – ९५,६०८
महिला – ८५,१०२

- Advertisement -

एकूण मतदार – १,८०,७१०

विद्यमान आमदार – राहुल बोंद्रे, काँग्रेस

बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात आक्रमक आणि राजकीय डावपेचात माहिर युवा नेतृत्व म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांची राजकीय पटलावर ओळख आहे. चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष त्यांनी भुषविले होते. वडील सिद्धविनायक बोंद्रे यांच्याकडून समाजकारण आणि राजकारणाचे धडे राहुल बोंद्रे यांनी गिरवले. २००० मध्ये चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाल्यावर त्यांनी शहर विकासाच्या अनेक संकल्पना मांडत त्या यशस्वीपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. २००४ मध्ये त्यांनी विधानसभा लढविली. मात्र थोड्या फरकाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी पताका फडकावीत त्यांनी विधानसभा गाठली. मतदारसंघात केलेली विकास कामे आणि जनसंपर्काच्या भरवशावर त्यांनी पुन्हा २०१४ मध्ये विजयी मिळवला.

Rahul_Bondre
आमदार राहुल बोंद्रे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) राहुल बोंद्रे, काँग्रेस – ६१,५८१

२) सुरेशाप्पा कबुतरे, भाजप – ४७,५२०

३) ध्रुपदराव साळवे, राष्ट्रवादी – ३३,६९९

४) डॉ. प्रतापसिंग राजपुत, शिवसेना – २६,९२९

५) विनोद खरपास, मनसे – ३,१०३



हे वाचा : ५ – बुलढाणा लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -