घरमहा @२८८चिपळूण विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २६५

चिपळूण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २६५

Subscribe

सातारा जिल्ह्यातील चिपळूण (विधानसभा क्र. २६५) विधानसभा मतदारसंघ आहे.

निसर्गसंपन्न चिपळूण हे अनेक घाटांनी वेढलेलं आहे. चिपळूण व आसपासचा परिसर हे विविध जातींचे पक्षी विपुलतेनं बघण्याचं ठिकाण आहे. वसिष्ठी, जगबुडी या नद्यांमध्ये मोठमोठ्या मगरींचे वास्तव्य आहे. इथल्या नद्यांच्या खाड्या या निसर्ग संपत्तीने व खारफुटीच्या वनांनी समृद्ध आहेत. ऐन पावसाळ्यात वीर देवपाट व चिपळूणजवळचा सवतसडा हे धबधबे अतिशय सुंदर दिसतात… अगदी चुकवू नयेत असे! इथे असलेली `डेरवणची शिवसृष्टी` ही सावर्डे गावापासून फक्त २ कि.मी. वर आहे. चिपळूणचे परशुराम मंदिर व विंध्यवासिनी ही तर कोकणभूमीची आराध्यदैवतं! त्यांच्या दर्शनाशिवाय कोकण सफर पूर्ण कशी होणार? जवळच्या वशिष्ठीच्या खाडीमुखावर वसलेल्या गोवळकोट किल्ल्याचा परिसर अतिशय सुंदर असून आवर्जून पाहावा असाच आहे.चिपळूण हा रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका आहे. या तालुक्यात १६७ गावे, १ नगरपरिषद व १३० ग्रामपंचायती आहेत.


 

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – २६५

मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या
पुरुष – १२,२१,१३
महिला – १२,७५,७५

एकूण मतदार – २४९४८८


 

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदारसंघातून २००९-२०१४ असे दोन वेळा सदानंद चव्हाण निवडून आले. ते शिवसेनेत आहेत. तिवरे धरण फुटल्याप्रकरणी सदानंद चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी विरोधकांनी केली होती.

विद्यमान आमदार सदानंद चव्हाण ,शिवसेना

१. सदानंद चव्हाण ,शिवसेना – ७५६९५
२. शेखर निकम, राष्ट्रवादी- ६९६२७
३. माधव गवळी,बीजेपी- ९१४३
४. रश्मी कदम- काँग्रेस- ३७०२
५. गोपीनाथ झापळे,अपक्ष – २७२०

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -