घरमहा @२८८चोपडा विधानसभा मतदारसंघ - म.क्र.१०

चोपडा विधानसभा मतदारसंघ – म.क्र.१०

Subscribe

जळगाव जिल्ह्यातील चोपडा (विधानसभा क्र.१०) विधानसभा मतदारसंघ आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. चोपडा विधानसभा हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. चोपडा तालुका व यावल तालुक्यातील काही भाग याचा मिळून चोपडा विधानसभा क्षेत्र झालेले आहे. २००९ च्या पुनर्रचनेत हा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. या मतदारसंघातुन राखीव झाल्यावर प्रथम राष्ट्रवादीचे माजी आ.जगदीश वळवी हे जिंकले होते. मात्र, २०१४ ला शिवसेनेचे विद्यमान आ.चंद्रकांत सोनवणे यांनी बाजी मारली होती. या निवडणुकीत जगदीश वळवी यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपकडून लढले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीसाठी कमळासोबत फारकत घेऊन हातावर पुन्हा घड्याळ बांधले असुन मतदार संघात फेर्‍या सुरू केल्या आहे. या विधान सभा क्षेत्रात कोणत्याच पक्षाचा प्रभाव विधान सभेच्या निवडणुकीत गेल्या निवडणुकीच्या निकालावरून दिसुन येत आहे. मात्र, भाजपा सेनेची युती राहिल्यास सेनेला त्याचा नक्कीच फायदा होईल.

मतदारसंघ क्रमांक : १०

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण : अनुसूचीत जमाती

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष : १,५८,२३६
महिला : १,४९,५२३
तृतीयपंथी : १
एकूण मतदान : ३,०७,७६०

विद्यमान आमदार : चंद्रकांत सोनवणे, शिवसेना

२०१४ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर उमेदवारी करत प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी विजय मिळविला होता. मात्र, सेनेसमोर ऐन निवडणुकीच्या वेळी अडचणीत वाढ झाल्या आहेत. विद्यमान आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांना घरकुल घोटाळ्यात जेलवारी करावी लागल्याने नविन उमेदवाराचा शोध सेनेला घ्यावा लागणार आहे. याठिकाणी सेनेत दोन गट असल्याने दुसर्‍या गटाचे माजी आमदार कैलास पाटील याच्याकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करित आहे.तर सेना प्रा.चंद्रकांत सोनवणे याच्या घरातील सदस्याला संधी देते याकडे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवलेले माजी आमदार जगदीश वळवी यांनी पुन्हा राष्ट्रवादी मध्ये पक्षांतर केल्याने त्यांनी देखील निवडणुकीची तयारी केलेली आहे.

चोपडा विधानसभा मतदारसंघ आमदार चंद्रकांत सोनवणे

२०१४ विधानसभा निवडणुकीची परिस्थिती

चंद्रकांत सोनवणे – शिवसेना – ५४,१७६
माधुरी पाटील – राष्ट्रवादी – ४२,२४१
जगदीश वळवी – भाजप – ३०,५५९


हे देखील वाचा – जळगाव लोकसभा मतदारसंघ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -