घरमहा @२८८कुलाबा विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १८७

कुलाबा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १८७

Subscribe

कुलाबा (विधानसभा क्र. १८७) हा मुंबई शहरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातला हा शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे. मुंबईचं दक्षिणेकडचं हे शेवटचं टोक! सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे. इथे १९६२ सालापासून आत्तापर्यंत झालेल्या १२ विधानसभा निवडणुकांपैकी ९ वेळा इथून काँग्रेसचा उमेदवार विधानसभेवर गेला आहे. मात्र, २०१४च्या मोदी लाटेमध्ये काँग्रेसचा अभेद्य गड पराभूत झाला आणि भाजपच्या राज पुरोहित यांना इथल्या निष्ठावान काँग्रेस मतदारांनी विजयी केलं. या मतदारसंघात एकूण २९१ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १८७

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,४९,७३९
महिला – १,०४,१९०

- Advertisement -

एकूण मतदार – २,५३,९२९


Raj Purohit
राज पुरोहित

विद्यमान आमदार – राज पुरोहित, भाजप

५ वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेलेले राज पुरोहित हे भाजपचे कट्टर अनुयायी मानले जातात. मुंबई महानगर पालिकेमध्ये देखील त्यांनी १९८५ साली नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. आमदारकीच्या काळात सरकारमध्ये विविध खात्यांचे राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी कार्यभार पाहिला आहे. भाजपच्या मुंबईतील अनुभवी आमदारांमध्ये राज पुरोहित यांचं नाव घेतलं जातं. पुण्यातील एका कथित जमीन घोटाळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज पुरोहित यांच्यावर आरोप केले होते. त्याशिवाय काही वर्षांपूर्वी राज पुरोहित यांच्या संभाषणाच्या ऑडिओ टेप व्हायरल झाल्या होत्या. यामध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत आहेत. मुंबई अध्यक्षपदावरून त्यांच्यात आणि आशिष शेलार यांच्यात अनेकदा वाद झाल्याचं देखील पाहायला मिळालं आहे.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) राज पुरोहित, भाजप – ५२,६०८
२) पांडुरंग सकपाळ, शिवसेना – २८,८२१
३) अॅनी शेख, काँग्रेस – २०,४१०
४) बशीर पटेल, राष्ट्रवादी – ५९६६
५) अरविंद गावडे, मनसे – ५४५३

नोटा – १५१६

मतदानाची टक्केवारी – ४६.१९ %


हेही वाचा – दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -