घरमहा @२८८दहिसर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १५३

दहिसर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १५३

Subscribe

दहिसर (विधानसभा क्र. १५३) हा मुंबई उपनगरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

दहिसर आणि आसपासच्या परिसरामध्ये व्यापारी वर्गाचं प्राबल्य असलं, तरी या भागामध्ये मराठी भाषिकांचं प्रमाण जास्त आहे. मूळचा ठाणे जिल्ह्याचा हिस्सा असलेला दहिसर १९५६मध्ये मुंबईला जोडला गेला. त्यामुळेच मुंबईचं उत्तरेकडचं टोकाचं ठिकाण म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो. एकूण २९३ मतदान केंद्र या मतदारसंघात आहेत. शिवसेना आणि भाजपचा या मतदारसंघात वरचष्मा राहिला आहे.

मतदारसंघ क्रमांक – १५३

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,६९,६६४
महिला – १,४६,९०९

- Advertisement -

एकूण मतदार – ३,१६,६०७


Manisha Chaudhary
भाजप आमदार मनिषा चौधरी

विद्यमान आमदार – मनिषा चौधरी, भाजप

२०१४मध्ये मनीषा चौधरी या पहिल्यांदाच विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. मात्र, याआधी त्यांनी भाजपच्या पक्षीय पातळीवर विविध पदांवर भूमिका पार पाडली आहे. २००९पासून त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य देखील राहिल्या आहेत. याशिवाय मुंबई महानगर पालिकेमध्ये त्याच वर्षी त्या निवडून देखील आल्या होत्या. ठाण्यामध्ये त्यांनी भाजपच्या विविध समित्यांवर कामगिरी बजावली आहे.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) मनिषा चौधरी, भाजप – ७७,२३८
२) विनोद घोसाळकर, शिवसेना – ३८,६६०
३) शीतल म्हात्रे, काँग्रेस – २१,८८९
४) शुभा राऊळ, मनसे – १७,४३९
५) नोटा – १९०७

मतदानाची टक्केवारी – ५०.५० %


हेही वाचा – दहिसर लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -