दर्यापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ४०

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर (विधानसभा क्र. ४०) विधानसभा मतदारसंघ आहे.

Amravati
daryapur assembly constituency
दर्यापूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ४०

अमरावती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी दर्यापूर मतादारसंघ (मतदारसंघ क्रमांक ४०) आहे. हे शहर चंद्रभागा नदीच्या काठी वसलेले आहे. बेरारचा राजा दर्या इमाद शाह यांच्या नावावरुन या शहराचे नाव दिर्यापूर असे पडले. हे शहर कापसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. २०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, दर्यापूरची लोकसंख्या १,७५,०६१ आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. १९९० सालापासून या मतदारसंघात शिवसेनी सत्ता आहे. २०१४ साली शिवसेना आणि भाजपने विभक्तपणे निवडणूक लढवायचा निश्चय केला आणि भाजपचे उमेदवार रमेश गणपतराव बुंडीले यांचा विजय झाला.

मतदारसंघ क्रमांक – ४०

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जातीसाठी

मतदारांची संख्या

पुरुष –  १,४८,२८३
महिला – १,३३,२३४
एकूण – २,८१,५२०

विद्यमान आमदार – रमेश गणपतराव बुंदिले, भाजप

रमेश गमपतराव बुंदिले यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणुक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. रमेश बुंदिले हे उच्च शिक्षित आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात मुख्य अभियंता म्हणून नोकरी केली आहे. ३१ डिसेंबर २०१२ रोजी ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यापासून त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी काम केले. त्यांच्या कामावर खुश होऊन पक्षाने त्यांची निवड महाराष्ट्र राज्य विधानसभेवर केली.

mla ramesh bundile
विद्यमान आमदार रमेश बुंदिले

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) रमेश गणपतराव बुंदिले, भाजप – ६४,२२४
२) बळवंत वानखेडे, रिपाई – ४४,६४२
३) अभिजीत अडसुळ, शिवसेना – ३२,२५६
४) दिनेश बाबू, राष्ट्रवादी – १४, ६७१
५) सिद्धार्थ वानखेडे – काँग्रेस – १२,४५५


हेही वाचा – अमरावती लोकसभा मतदारसंघ