घरमहा @२८८देवळाली विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२६

देवळाली विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२६

Subscribe

नाशिक जिल्ह्यातील देवळाली (विधानसभा क्र. १२६) विधानसभा मतदारसंघ आहे.

नाशिक जिल्ह्यातील देवळाली हा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. राज्यातील सहा छावणी परिषदपैकी एक असलेला देवळाली हा भाग होय. या मतदारसंघात भगुर, नाशिक तालुक्याचा काही भाग नाशिकरोड परिसर हा भाग येतो. अनुसूचीत जाती साठी राखीव असलेला हा मतदारसंघ १९८९ पासून शिवसेनेच्याच गळ्यात विजयाची माळ घालत आलेला आहे. नाशिक तालुक्याचा ग्रामीण भाग आणि छावणी परिषद हे दोन ठिकाणे या मतदारसंघातील निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची आहेत. या मतदारसंघात भगुर आणि तेथील सामाजिक परिस्थिति निर्णायक मतदान करतात.

मतदारसंघ क्रमांक : १२६

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण : अनुसूचीत जाती

मतदारांची संख्या
पुरुष : १,३८,०४२
महिला : १,२५,६८६
तृतीयपंथी : ०
एकूण मतदान २,६३,७२८

- Advertisement -

विद्यमान आमदार : योगेश घोलप, शिवसेना

शिवसेनेसाठी जिल्ह्यातील सर्वात मजबूत मतदारसंघम्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी १९८९ पासून हा मतदारसंघ शिवसेनेसाठी मजबूत करून ठेवला. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी लोकप्रतिंनिधीत्व कायद्यांतर्गत त्यांच्यावर सहा वर्षे निवडणूक न लढवण्याची नामुष्की आल्याने त्यांचे पुत्र योगेश घोलप हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढले आणि जिंकले देखील. या निवडणुकीच्या जोरावर योगेश घोलप यांनी अपघातानेच विधानभवनात प्रवेश जरी केला तरी गेल्या पाच वर्षात त्यांनी आपला जनसंपर्क आणि विकासकामे यांच्या जोरावर आपली छाप या मतदारसंघवर पाडली आहे.

देवळाली विधानसभा मतदारसंघ आमदार योगेश घोलप

२०१४ विधानसभा निवडणुकीची परिस्थिती

योगेश घोलप – शिवसेना – ४९,७५१
रामदास सदाफुले – भाजप – २१,५८०
नितिन मोहिते – राष्ट्रवादी – १८,४०२


हे देखील वाचा – नाशिक लोकसभा मतदारसंघ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -