घरमहा @२८८धुळे शहर विधानसभा मतदारसंघ - म.क्र. ७

धुळे शहर विधानसभा मतदारसंघ – म.क्र. ७

Subscribe

धुळे जिल्ह्यातील धुळे शहर (विधानसभा क्र.७) विधानसभा मतदारसंघ आहे.

धुळे जिल्ह्यातील धुळे शहर हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. २००९ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचना मध्ये हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी सोडण्यात आला. धुळे तालुक्यातील ११ गावे गाळुन स्वतंत्र शहर मतदार संघ तयार करण्यात आला.या मतदार संघात मराठा , मुस्लिम व दलित समाजाचे मतदान मोठे आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रोडच्या पुर्वेकडील भाग व विटा भटटीचा भाग हा ९० टक्के मुस्लिम मतदारांचा असुन मनपातील सहा प्रभाग मुस्लिम मतदारांचे आहेत. तर शहरात मराठा समाजाचे निर्णायक मतदार आहेत.

मतदार संघ क्रमांक :

- Advertisement -

मतदार संघ आरक्षण : खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,६८,३४३
महीला मतदार – १,५१,७५८
तृतीयपंथी – १६
एकुण मतदार – ३,२०,११७

- Advertisement -

विदयमान आमदार : अनिल गोटे, भाजप

धुळयाचे आमदार अनिल गोटे यांनी जनसंघाचे काम करण्यासाठी धुळयामधून सामाजिक कामांना सुरुवात केली. त्यानंतर शेतकरी संघटनेत शरद जोशी यांच्यासमवेत राज्यभरात काम केले असुन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांसमवेत त्यांचे घनिष्ठ संबंध राहीले आहे. धुळे शहर मतदार संघातुन त्यांनी आता पावेतो चार वेळेस प्रतिनिधीत्व केले आहे. सध्या भारतीय जनता पार्टीमधे झालेल्या इनकमिंगमुळे तसेच माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ सुभाष भामरे आणि भाजपाच्या जिल्हास्तरीय नेत्यांबरोबर असलेल्या मतभेदांमुळे नाराज होत त्यांनी आमदार पदाला राजीनामा दिला आहे.

धुळे शहर विधानसभा मतदारसंघ आमदार अनिल गोटे

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीची परीस्थिती

अनिल गोटे – भाजपा – ५७,७८०
राजवर्धन कदमबांडे – राष्ट्रवादी – ४४,८५२
साबीर खान – कॉग्रेस – १३,४४०
सुभाष देवरे – शिवसेना – २७,३७९


हे देखील वाचा –  धुळे लोकसभा मतदारसंघ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -