गंगापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १११

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर (विधानसभा क्र. १११) विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

Aurangabad
111 गंगापूर विधानसभा मतदारसंघ
गंगापूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १११

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील एक प्रमुख मतदार संघ म्हणून गंगापूर विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. गंगापूर मतदार संघातील जातीय समीकरणांवर लक्ष दिल्यास या मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य असल्याचे पहायला मिळतं. त्याबरोबरच माळी, दलितमुस्लिम, धनगर यांच्यासह इतर समाजही या मतदारसंघात आहेत. मागील दहा वर्षांपासून प्रशांत बंब हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. २०१४ च्या निवडणूकीत प्रशांत बंब यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली. त्यावेळी शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. परिणामी प्रशांत बंब यांनी शिवसेनेच्या अंबादास दानवे यांचा पराभव करत पुन्हा आमदार झाले. पण यंदाची गणितं वेगळी असणार आहेत. यंदा शिवसेनाभाजपने युती केली आहे. त्यामुळे युतीमध्ये गंगापूर मतदारसंघ भाजपकडे गेला तर शिवसेनेचे इच्छूक बंडखोरी करण्याची शक्यता आहे.

मतदारसंघ क्रमांक १११
मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरुष – १,४४,६५१
महिला ,२६,३८६
एकूण – ,७१,०४०

विद्यमान आमदार – प्रशांत बन्सीलाल बंब

mla prashant-bamb
विद्यमान आमदार – प्रशांत बंब

गंगापूर विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत बंब हे २००९ च्या निवडणूकीत अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपच्या चिन्हावर ते पुन्हा निवडून आले. आमदार प्रशांत बंब हे उच्चशिक्षित आहेत. त्यांच्यकडे बी.कॉम. आणि एम.बी.. च्या पदव्या आहेत. वाचनाची आवड असलेले आमदार प्रशांत बंब हे आपल्या मतदारसंघात युवक, शेतकरी, महिलांसाठी मेळाव्यांचे आयोजन करण्यात पुढाकार घेतात.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

) प्रशांत बन्सीलाल बंब, भाजप५५,४८३
) अंबादास दानवे, शिवसेना३८,२०५
) कृष्णा पाटीलडोनगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस३३,२१६
) शोभाबाई खोसरे, काँग्रेस१६,८२६
) सर्जेराव चव्हाण, अपक्ष – १४,२३८


हेही वाचा – औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १०८