घरमहा @२८८गेवराई विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २२८

गेवराई विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २२८

Subscribe

बीड जिल्ह्यातील गेवराई (विधानसभा क्र. २२८) विधानसभा मतदारसंघ आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई हा क्रमांक २२८ वा विधानसभा मतदारसंघ आहे. बीड जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेला मतदारसंघ म्हणजे गेवराई विधानसभा मतदारसंघ. या विधानसभा मतदार संघातील लढत ही सेना-भाजपची युती होणार का, यावर अवलंबून आहे. कारण बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघ हा एकमेव मतदारसंघ आहे. जिथे शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षाकडून उमेदवारीसाठी ताकत लावली जात आहे. परंपरागत हा मतदारसंघ जरी भाजपच्या वाट्याला आला असला तरी शिवसेनेकडून ही या मतदारसंघात उमेदवारीची दावेदारी केली जात आहे.

मतदारसंघ क्रमांक – २२८

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,६७,३९३

महिला – १,४६,१५५

एकूण मतदार – ३,१३,५४८

विद्यमान आमदार – लक्ष्मण पवार, भाजप

दिवंगत माजी आमदार शाहूराव पवार यांचे नातू आणि माजी आमदार माधवराव पवार यांचे पुत्र असलेले लक्ष्मण पवार कायद्याचे पदवीधर आहेत. सुरुवातीला त्यांनी औरंगाबाद खंडपीठात वकिली केली. लक्ष्मण पवार यांनी गेवराई नगर पालिका क्षेत्रातून राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी नरगाध्यक्ष म्हणून काम केले. गेवराई विधानसभा मतदार संघातून माजी मंत्री बदामराव पंडित यांचा ६० हजार मतांनी त्यांनी पराभव केला.

Laxman Pawar
आमदार लक्ष्मण पवार

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) लक्ष्मण पवार, भाजप – १,३६,३८४

२) बदामराव पंडित, राष्ट्रवादी – ७६,३८३

३) अॅड. सुरेश हात्ते, काँग्रेस – ६,६१२

४) अजय दाभाडे, शिवसेना – ४,४२४

५) भाऊराव प्रभाळे, भाकप – २,५२५

हे वाचा – ३९ – बीड लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -