घनसावंगी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १००

जालना जिल्ह्यातील घनसावंगी (विधानसभा क्र. १००) विधानसभा मतदारसंघ आहे.

Jalna
ghansavangi assembly constituency
घनसावंगी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १००

जालना जिल्ह्यातील घनसावंगी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा मराठवाड्यातील बालेकिल्ला म्हणून घनसावंगीकडे पाहिले जाते. १९९९ पासून सातत्याने माजी मंत्री राजेश टोपे हे याठिकाणाहून निवडून येत आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यातील घनसावंगी हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. मराठवाड्यातील इतर मतदारसंघाप्रमाणेच याही ठिकाणी रस्त्यांची दूरवस्था आहे. सिंचन आणि उद्योगांच्या सोयी नाहीत. बेरोजगारी वाढली असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

मतदारसंघ क्रमांक – १००

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,४८,३५६
महिला – १,३५,२०६
एकूण मतदान – २,८३,५६२

विद्यमान आमदार – राजेश टोपे, राष्ट्रवादी

माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे हे १९९९ पासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. टोपे यांचे वडील माजी खासदार अंकुशराव टोपे यांनी विकासाच्या राजकारणाचा पाया मतदारसंघात रचला होता. आपल्या वडीलांचा वारसा पुढे नेण्याचे काम राजेश टोपे करत आहेत. मागच्या २० वर्षांत त्यांनी गोदावरी नदीवर बंधारे बांधणे, पिण्याच्या पाण्याच्या योजना करणे, पॉलिटेक्निक महाविद्यालय, ट्रामा केअर सेंटर अशी अनेक विकासकामे केली आहेत. २००९ साली त्यांनी विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री अर्जून खोतकर यांचा पराभव केला होता. तर २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही भाजपच्या विलास खरात यांना मोठ्या मताधिक्यांनी पराभूत केले होते.

मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी टोपे हे शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली होती. काहीवेळातच टोपे यांनी या चर्चेचे खंडनही केले होते.

Ghansawangi MLA Rajesh Tope
आमदार राजेश टोपे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) राजेश टोपे, राष्ट्रवादी – ९८,०३०
२) विलासराव खरात, भाजप – ५४,५५४
३) हिकमत उडाण, शिवसेना – ४५,६५७
४) सुनील आर्दंड, मनसे – ३,५८३
५) डॉ. संजय लाखे पाटील, काँग्रेस – २,७६२


हे वाचा – परभणी लोकसभा मतदारसंघ