गोंदिया विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ६५

गोंदिया जिल्ह्यात गोंदिया विधानसभा मतदारसंघ (विधानसभा क्र. ६५ ) आहे.

gondiya assembly constituency
गोंदिया विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ६५

गोंदिया विधानसभा मतदारसंघ हा गोंदिया जिल्ह्यात आहे. हा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. गोंदिया शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. शहरात सर्व शासकीय कार्यालयांचे मुख्यालय आहे. २०११च्या जनगननेसुार गोंदियाची लोकसंख्या ४ लाख २१ हजार ६५० इतकी आहे.

मतदारसंघ क्रमांक – ६०

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,४६,४८२
महिला – १,४७,९१४
एकूण मतदार – २,९४,३९९

विद्यमान आमदार – गोपालदास शंकरलाल अग्रवाल, काँग्रेस

mla gopaldas agarwal
विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपालदास अग्रवाल हे मोठे नाव आहे. ते सध्या गोंदियाचे आमदार आहेत. २००४ पासून ते गोंदियाचे आमदार आहेत. १९७५ ते १९८५ ते भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते. १९८५ ते १९९२ अग्रवाल भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव होते. २००४ पासून ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आहेत.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) गोपालदास अग्रवाल, काँग्रेस – ६२,७०१
२) विनोदकुमार अग्रवाल, भाजप – ५१,९४३
३) अशोक गुप्ता, राष्ट्रवादी – ३३,१५०
४) राजकुमार कुथे, शिवसेना – २०,८७६
५) योगेश बनसोड, बसप – १५,९२५


हेही वाचा – ११ – भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ