घरमहा @२८८गोरेगाव विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १६३

गोरेगाव विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १६३

Subscribe

गोरेगाव (विधानसभा क्र. १६३) हा मुंबई उपनगरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

१९६२पासून आत्तापर्यंत या मतदारसंघात फक्त १९८०च्या निवडणुकांमध्येच काँग्रेसचे उमेदवार सी. एम. शर्मा निवडून आले आहेत. इतर वेळी इथल्या मतदारांनी उजव्या विचारसरणीच्या भाजप आणि शिवसेनेलाच पसंती दिली आहे. २००४ आणि २००९मध्ये शिवसेनेचे सुभाष देसाई इथे निवडून आले आहेत. लोकसभा मतदानाच्या विरोधात जाऊन या मतदारसंघाने काँग्रेसला नाकारून भाजप-शिवसेनेला साथ दिली. तर २०१४मध्ये भाजपच्या तिकिटावर विद्या ठाकूर इथून निवडून आल्या आहेत. या मतदारसंघात एकूण ३३५ मतदान केंद्र आहेत. विशेषत: मराठी भाषिक असणाऱ्या या मतदारसंघात भाजपने आपला चांगलाच जम बसवला आहे.

मतदारसंघ क्रमांक – १६३

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,८७,८७६
महिला – १,४९,८१७

- Advertisement -

एकूण मतदार – ३,३७,६९३


Vidya Thakur
विद्या ठाकूर

विद्यमान आमदार – विद्या ठाकूर, भाजप

१९९२ सालापासून विदया ठाकूर भाजपमध्ये कार्यरत आहेत. १९९२ ते २०१२ या काळात सलग ४ वेळा त्या मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. तसेच, २००७मध्ये महापालिकेच्या उपमहापौर म्हणून देखील त्यांनी कामकाज पाहिले आहे. सुभाष देसाई यांचा ५ हजार मतांनी पराभव करणाऱ्या विद्या ठाकूर यांना विद्यमान सरकारमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) विद्या ठाकूर, भाजप – ६३,६२९
२) सुभाष देसाई, शिवसेना – ५८,८७३
३) गणेश कांबळे, काँग्रेस – १८,४१४
४) शशांक राव, राष्ट्रवादी – ९२८७
५) शरद सावंत, मनसे – ६४२०

नोटा – १९३५

मतदानाची टक्केवारी – ४८.५० %


हेही वाचा – मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -