घरमहा @२८८हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ४६

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ४६

Subscribe

वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट (विधानसभा क्र. ४६) विधानसभा मतदारसंघ आहे.

हिंगणघाट हा मतदारसंघ वर्धा जिल्ह्यात आहे. हे शहर कापूस व्यापाराचे केंद्र आहे. २०११ च्या जनगननेनुसार हिंगणघाटची लोकसंख्या २,२४,०१७ आहे. हा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. या मतदारसंघात १९७२ ते १९८५ पर्यंत काँग्रेसची सत्ता राहिली. त्यानंतर १९८५ साली काँग्रेस सोशलिस्टचे वसंत बोंडे जिंकून आले. बोंडे १९९० साली जनता दलात सामील झाले आणि पुन्हा एकदा १९९० च्या विधानसभा निवडणुकीत जिंकून आले. १९९५ ते २००४ या मतदारसंघात शिवसेनेची सत्ता राहिली. २००४ साली पहिल्यांदा राष्ट्रवादीला या मतदारसंघात जिंकता आले. मात्र, २००९ साली शिवसेनेची पुन्हा सत्ता आली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हिंगणघाट मतदारसंघात भाजपचा पहिला उमेदवार निवडून आला.

मतदारसंघ क्रमांक – ४६
मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या
पुरुष – १,३७,२३८
महिला – १,२३,७२९
एकूण मतदार – २,६०,९६८

विद्यमान आमदार – समीर कुणावार, भाजप

समीर कुणावार हे हिंगणघाटचे विद्यमान आमदार आहेत. २००९ साली त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदा अपक्ष उमेदवारी लढवली होती. परंतु, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. २०१४ साली भाजपने त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत कुणावार ५१२८५ मतांच्या फरकाने निवडून आले. याशिवाय २००० साली ते नगरसेवक होते. २००१ साली नगराध्यक्ष झाले. त्यांच्या उल्लेकनीय कार्यामुळे त्यांना उत्कृष्ट नगराध्यक्ष पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.

- Advertisement -
mla samir kunawar
विद्यमान आमदार समीर कुणावार

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) समीर कुणावार, भाजप – ९०,२७५
२) प्रलंय तेलंग, बहुजन समाजवादी पक्ष – २५,१००
३) राजू तिमांडे, राष्ट्रवादी – २३,०८३
४) अशोक शिंदे, शिवसेना – २१,५२३
५) श्रीमती उषा थुटे, काँग्रेस – १२,६४५


हेही वाचा – ८ – वर्धा लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -