घरमहा @२८८जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - म.क्र.१४

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – म.क्र.१४

Subscribe

जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण (विधानसभा क्र.१४) विधानसभा मतदारसंघ आहे.

जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. या मतदारसंघात जळगाव तालुक्यातील काही गावे आणि धरणगाव तालुका येतो. धरणगाव तालुका हा आरएसएसचा बालेकिल्ला असल्याने भाजपसाठी एक वोटबँक आज तरी असल्याचे दिसते. त्याचा फायदा भाजपचा उमेदवार उभा राहिल्यास त्याला होवू शकतो. जळगाव ग्रामिण भागात दोन तालुक्यातील गावे येत असल्याने गुलाबराव पाटील याची नाड ग्रामीण भागाशी जोडलेली असल्याने त्यांना त्याचा फायदा होतो. धरणगाव व जळगाव या तालुक्यात शिवसेनेचा जोर आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका यावर शिवसेनेनेसह भाजपाचा बोलबाला आहे.राष्ट्रवादी कॉग्रेस याचाही चांगला मतदार आहे.यामुळे सेना व राष्ट्रवादी याच्यात मुख्यत: लढत होणार आहे.मात्र राष्ट्रवादी कॉग्रेसचे जळगाव ग्रामीणचे प्रमुख दावेदार माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना विधानसभा निवडणुकीपुर्वीच जेलमध्ये जावे लागल्याने त्याच्या जागी गुलाबरावांचा मुलगा विशाल देवकर याचे नाव पुढे करण्यात येत आहे.मात्र तो कितपत ना.पाटील याच्याशी लढत देवू शकतो हेतर येणारा निकालाच ठरवू शकतो.

मतदारसंघ क्रमांक : १४

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण : खुला

मतदारांची संख्या
पुरुष : १,६३,७८६
महिला : १,५०,८१७
तृतीयपंथी : १
एकूण मतदान ३,१४,६०४

- Advertisement -

विद्यमान आमदार : गुलाबराव पाटील, शिवसेना

या मतदारसंघात देवकर व पाटील याच्या पारंपारिक लढत होत आली आहे. मात्र, यावेळी गुलाबराव पाटील यांना गुलाबराव देवकर यांचे तगडे आव्हान राहिल असे चित्र असतांनाच घरकुल घोटाळ्याचा निकाला लागल्याने देवकरांना जेलमध्ये जावे लागले. त्यामुळे गुलाबराव पाटील यांचा मार्ग सुकर जरी झाला असला तरी देवकर यांच्या मुलाचे आव्हान राहिल असे सध्या दिसत चित्र आहे. गुलाबराव पाटील यानी आपल्या जाहिरनाम्यातील जवळपास 80 टक्के वचने पुर्ण केलेली दिसत आहे.फक्त राहिले आहे ते बाभुरी पुल व बलुन बंधार्‍याचा प्रश्‍न,कवियात्री बहिणाबाई चौधरी स्मारकाला निधी, हे कामे बाकी आहे.तसेही लोकसभेत या विधानसभा क्षेत्राने भाजपाला मोठी साथ दिली आहे.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आमदार गुलाबराव पाटील

२०१४ विधानसभा निवडणुकीची परिस्थिती

गुलाब पाटील – शिवसेना – ८४०२०
गुलाबराव देवकर – राष्ट्रवादी -५२६५३


हे देखील वाचा – जळगाव लोकसभा मतदारसंघ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -