घरमहा @२८८जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ - म.क्र. १३

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ – म.क्र. १३

Subscribe

जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर (विधानसभा क्र.१३) विधानसभा मतदारसंघ आहे.

जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. जळगाव शहरामध्ये मध्यमवर्गीय तसेच अनेक कामगार वर्गाचा समावेश होतो. जळगाव महानगरपालिका पूर्ण क्षेत्र यामध्ये येत आहे. महापालिकेमध्ये सध्याचे संख्याबळ एकूण ७५ नगरसेवकांनी ५७ भाजप, १५ शिवसेना आणि ३ एमआयएम असे आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविण्यात भाजपला यश आलेले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा हक्काचा मतदारसंघ म्हणून देखील या मतदारसंघाकडे बघितले जाते.

मतदारसंघ क्रमांक – १३

- Advertisement -

आरक्षण – खुला

मतदार संख्या
पुरुष – २,१०,८७७
महिला – १,८९,३०८
तृतीयपंथी – ३४
एकुण – ४,००,२१९

- Advertisement -

विद्यमान आमदार – सुरेश दामू भोळे , भाजप

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुरेश दामू भोळे उर्फ राजूमामा हे आमदार आहेत. त्यांनी २०१४ साली गेल्या ३५ वर्षापासून आमदार असलेल्या सुरेश जैन यांचा पराभव केला होता. मोदी लाटेत ते निवडून आले होते. यंदाही सुरेश भोळे हे इच्छुक असून भाजपातून अद्यापही कोणीही उमेदवारीसाठी दावा केलेला नाही. कैलास सोनवणे, ललित कोल्हे हे इच्छुक मागे पडले आहेत. घरकुल घोटाळ्याच्या लागलेल्या निकालात कैलास सोनवणे यांना तर ललित कोल्हे यांचे वडील विजय कोल्हे यांना शिक्षा लागली आहे. ते नाशिक कारागृहात आहेत. तर ललित कोल्हे यांची आई सिंधू कोल्हे ह्या माफीच्या साक्षीदार आहेत. तरीदेखील आ.भोळे यांना विरोध करणारा पक्षांतर्गत गट असल्याने भोळे यांना विजय सोपा नाही, हेच चित्र दिसत आहे. वर्षभरापूर्वी जळगाव मनपात भाजपची सत्ता आली. आ.भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांची महापौरपदी वर्णी लागली. ना.गिरीश महाजन यांनी एक वर्षात शहराचा कायापालट करून दाखवितो असे म्हटले होते. प्रत्यक्षात आज रस्ते, वीज, पाणी यांच्या समस्या पूर्णपणे भाजपला सोड्वित्या आलेल्या नाहीत. शहरातील सर्व रस्त्याची गंभीर दुर्दशा झालेली आहे. भाजपवर असणारी जनतेची नाराजी आ.भोळे यांच्या विजयात अडचण ठरेल काय हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.

जळगाव शहर मतदारसंघाचे आमदार सुरेश भोळे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

सुरेश भोळे – भाजप – ८८,३६३
सुरेशकुमार जैन – शिवसेना – ४६,०४९


हे देखील वाचा – जळगाव लोकसभा मतदारसंघ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -