घरमहा @२८८जिंतूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ९५

जिंतूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ९५

Subscribe

परभणी जिल्ह्यातील जिंतूर (विधानसभा क्र. ९५) विधानसभा मतदारसंघ आहे.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. जिंतूर विधानसभा मतदारसंघाचा १९९० पासूनचा इतिहास पाहीला तर येथे बोर्डीकर यांनी चार वेळा, कुंडलिक नागरे यांनी एकदा तर २०१४ साली राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांनी प्रतिनिधित्व केले आहे. २००९ साली मतदारसंघाची पुर्नरचना झाली. पूर्वी पाथरी विधानसभा मतदारसंघात असणारा सेलू तालुका जिंतूरमध्ये जोडण्यात आला. नव्या तालुक्यामुळे येथील राजकीय समीकरणे चागंलीच बदलली आहेत.

मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला या मतदारसंघातून मताधिक्य मिळालेले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत मतदारांचा कौल कुणाला असेल, हे पाहावे लागेल. तसेच मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परभणीमधील सेलू, पाथरी आणि परभणी येथे सभा घेणार आहेत. या तीनही जागा शिवसेनेकडे आहेत. मुख्यमंत्री या तीन तालुक्यांमध्ये सभा घेणार असल्यामुळे भाजप या जागांवर दावा करणार की काय? अशी शंका युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – ९५

मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या
पुरुष – १,६७,७७९
महिला – १,५६,३३३
एकूण मतदान – ३,२४,११५

विद्यमान आमदार – विजय भांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसमधील मितभाषी आमदार म्हणून विजय भांबळे यांची नाव घेतले जाते. अजित पवार यांच्या गटाचे विश्वासू आमदार म्हणूनही भांबळे ओळखले जातात. विजय भांबळे यांनी २००९ साली देखील विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर २०१४ साली त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून खासदारकीचीही निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणूकीतही त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यानंतर २०१४ साली त्यांनी विधानसभेत मोठ्या फरकाने विजय मिळवला. चार वेळा आमदार राहिलेल्या रामप्रसाद बोर्डीकरांचा त्यांनी तब्बल २६ हजार मताधिक्याने पराभव केला.

विजय भांबळे हे चांगल्या गोष्टीसहींत एका चुकीच्या कारणामुळेही काही दिवसांपूर्वी चर्चेत होते. जिंतूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यास भांबळे यांनी घरी बोलावून मारहाण केली होती. याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

mla vijay Bhamble
आमदार विजय भांबळे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) विजय भांबळे, राष्ट्रवादी – १,०६,९१२
२) रामप्रसाद कदम (बोर्डीकर), काँग्रेस – ७९,५५४
३) संजय सडेगावकर, भाजप – ३०,३१०
४) राम पाटील (खराबे), शिवसेना – ६९५९
५) कॉम्रेड राजन क्षीरसागर, सीपीआय – २२९१


हे वाचा – परभणी लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -